News Flash

जम्मू काश्मीर: पाण्याच्या टाकीत सापडली ५२ किलो स्फोटकं; पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती टळली

पुलवामा दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी झाला होता तेथून फक्त नऊ किमी अंतरावर ही स्फोटकं सापडली

जम्मू काश्मीरमध्ये हायवेजवळ ५२ किलो स्फोटकं जप्त करण्यात आली असून पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्यात भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. याशिवाय ५० डिटोनेटरही सापडले आहेत. पुलवामा हल्ला झाला होता तेथून काही अतंरावरच इतका मोठा स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध करत दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजता सर्च ऑपरेशन सुरु असताना एका बागेत पाण्याची टाकी पुरुन ठेवण्यात आली असल्याचं निदर्शनास आलं. या पाण्याच्या टाकीत जवळपास ५२ किलो स्फोटकं सापडली. जवळपास ४१६ पाकिटं होती. यामधील प्रत्येक पाकिटात १२५ ग्राम स्फोटकं होती. अजून शोध घेतला असता अजून एक टँक सापडला ज्यामध्ये ५० डिटोनेटर होते. या स्फोटकांना ‘सुपर ९०’ म्हटलं जातं.

महत्त्वाचं म्हणजे २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी झाला होता तेथून फक्त नऊ किमी अंतरावर ही स्फोटकं सापडली आहेत. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यातील १४ तारखेला आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेल्या कारने सुरक्षा ताफ्याला धडक दिली होती. या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 9:21 pm

Web Title: 52 kg explosives found near jammu and kashmir highway pulwama type attack averted by indian army sgy 87
Next Stories
1 “मोदी सरकारची कृषी विधेयकं शेतकरी विरोधी,” केंद्रीय मंत्र्याने दिला राजीनामा
2 डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा माजी मॉडेल अ‍ॅमी डोरिसचा आरोप
3 ‘ग्रेटर नेपाळ’च्या नावाखाली नैनीताल, देहरादूनवरही नेपाळ सांगतोय हक्क
Just Now!
X