03 March 2021

News Flash

Coronavirus : लोकसंख्या १.३ अब्ज, चाचणीसाठी भारतात फक्त ५२ प्रयोगशाळा

परदेशातून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे भारतात करोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

संग्रहित छायाचित्र

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारतात सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. तीर्थस्थळं, चित्रपटगृह, जीम, जलतरण तलाव, शाळा, कॉलेजेस बंद आहेत. कारण या ठिकाणी विद्यार्थी, नागरिक मोठया संख्येने एकत्र येतात. करोना व्हायरस संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही पावले उचलणे आवश्यक आहे.

क्वारॅनटाइनमध्ये असणाऱ्या संशयितांच्या हातावर छापे मारण्यात येत आहेत. जेणेकरुन इतरांनी अशी व्यक्तींपासून दूर रहावे. उपचारांपेक्षाही आजार फैलावू नये, यासाठी उचलण्यात आलेली ही पावले महत्वपूर्ण आहेत. भारतासारख्या महाकाय देशात करोनाने हात-पाय पसरल्यास त्याला रोखणे कठिण बनून जाईल. म्हणून सध्या उचललेली पावले योग्यच आहेत.

परदेशातून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे भारतात करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्याच्या घडीला भारतात १४५ पेक्षा जास्त करोनाचे रुग्ण असून आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.

आयसोलेशन बेडची संख्या किती?
१.३ अब्ज लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात करोनाग्रस्त किंवा संशयित करोना रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी ५० हजारपेक्षा जास्त आयसोलेशन बेडची व्यवस्था नाहीय. राज्यांच्या राजधान्या आणि प्रमुख जिल्ह्यांच्या रुग्णालयात हे आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत. महत्वाची बाब म्हणजे सध्याच्या घडीला करोना व्हायरसची लागण झाली आहे की, नाही हे चाचणी करणाऱ्या देशभरात फक्त ५२ प्रयोगशाळा आहेत.

बिहारमध्ये फक्त एक, गुजरातमध्ये दोन लॅब आहेत. या ५२ लॅबची मिळून, करोना व्हायरसच्या दिवसाला १ हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. चीनने आजाराचा धोका ओळखून वुहानमध्ये १२ दिवसात लॅब उभ्या केल्या. त्यामुळे आता दिवसाला १० हजार चाचण्या करणे शक्य आहे.

आणखी वाचा- Coronavirus : फिश फ्राय ते अंडी; आयसोलेशन वॉर्डातील रुग्णांसाठी खास मेन्यू

भारताने जर्मनीहून मागवले १० लाख Covid-19 टेस्ट किट
करोना व्हायरसविरोधात लढा देताना चाचणी आणि अचूक निदान करण्याची क्षमता महत्वाची आहे. त्या दृष्टीने भारताला तयारी करण्याची आवश्यकता आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) चाचणीचा वेग आणि निदान करण्याची क्षमता वाढवण्यासाठी जर्मनीहून १० लाख टेस्टींग किटची ऑर्डर दिली आहे. टेस्टींग किट बरोबरच चाचणीसाठी आणखी नऊ प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 2:31 pm

Web Title: 52 labs for coronavirus test for 1 3 billion people dmp 82
Next Stories
1 मुख्यमंत्रीपदासाठी शिवराजसिंह चौहान यांची तडफड पाहून कीव येते : कमलनाथ
2 Coronavirus : GoAir च्या कर्मचाऱ्यांना अनपेड लिव्हवर जाण्याचे आदेश
3 Coronavirus : फिश फ्राय ते अंडी; आयसोलेशन वॉर्डातील रुग्णांसाठी खास मेन्यू
Just Now!
X