28 October 2020

News Flash

धक्कादायक! ५४ दिवसांच्या मुलीला वडिलांकडूनच अमानुष मारहाण, रुग्णालयात जगण्यासाठी संघर्ष सुरु

निर्दयी पित्यामुळे ५४ दिवसांच्या मुलीचा रुग्णालयात आयुष्याशी संघर्ष

संग्रहित

केरळमध्ये एका निर्दयी पित्याने आपल्याच ५४ दिवसांच्या बाळाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळमधील एर्नाकुलम येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, १९ जून रोजी ही घटना घडली आहे. बाळाला एका खासगी रुग्णायात दाखल करण्यात आलं असून आयसीयूत ठेवण्यात आलं आहे. बाळाची प्रकृती सध्या गंभीर आहे.

४० वर्षीय आरोपी पिता शज्जू थॉमस याने आपली मुलगी बेडवरुन खाली पडल्याचा दावा केला होता. पण डॉक्टरांना मुलीची प्रकृती पाहून संशय आला. चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थॉमस याने दारुच्या नशेत मुलीला मारहाण केली आणि बेडवर फेकून दिलं.

पोलिसांनी मुलीच्या आईचा जबाबदेखील नोंदवला असून तिनेही मारहाण झाल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी आरोपी थॉमसला अटक केली असून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 2:29 pm

Web Title: 54 day old infant assaulted by father in kerala sgy 87
Next Stories
1 नेपाळच्या आडमुठ्या भूमिकेमुळे बिहारला पुराचा धोका
2 नवविवाहित दांपत्याला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी घेतल्या नदीत उड्या, त्यानंतर…
3 म्हशीनं पिकाची नासाडी केली म्हणून १५ वर्षाच्या मुलाची हत्या
Just Now!
X