‘ताश्कंद डिक्लरेशन’ ऊर्फ ‘ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट’ हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी केला गेला. या घटनेला आज ५४ वर्षे पूर्ण झाली. मात्र हा करार नक्की काय होता?, तो कशासाठी करण्यात आला होता?, त्याची पार्श्वभूमी काय याबद्दल अनेकांना ठाऊक नाही. या लेखामधून याच साऱ्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा केलेला प्रयत्न…

भारत आणि पाकिस्तानमध्ये करार

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर

सोव्हिएत युनियनचे प्रमुख अलेक्सी कोसिजीन यांच्या मध्यस्थीने झालेल्या करारावर भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी, तर पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी सह्य़ा केल्या.

कशासाठी झाला हा करार?

१९४७ साली भारत- पाकिस्तान फाळणीनंतर या दोन देशांमध्ये चिघळलेल्या सीमावादाने १९६५ मध्ये परत एकदा डोके वर काढले. ऑगस्ट १९६५ मध्ये पाकिस्तानी लष्कराने ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ या नावाने मोहीम काढून जम्मू काश्मीरच्या भारतीय प्रदेशात सन्य घुसवले. प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारनेही पाकिस्तानी लष्करावर हल्ला चढवला. ऑगस्ट आणि सप्टेंबर १९६५ मध्ये सतरा दिवस चालले.

युद्धानंतर काय घडलं?

हे युद्ध संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, अमेरिका आणि रशिया यांच्या प्रयत्नांनी २२ सप्टेंबर १९६५ रोजी युद्धबंदी करार होऊन थंडावले. दोन्ही बाजूंचे हजारो सनिक या युद्धात मारले गेले आणि दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने रणगाडे आणि इतर शस्त्रास्त्रांचा वापर झालेले हे युद्ध होते असे म्हटले जाते. सतरा दिवस चाललेले हे युद्ध अनिर्णीत अवस्थेतच थांबले.

सोव्हिएत युनियन आणि चीनचा काय संबंध?

या युद्धानंतर भारत आणि सोव्हिएत युनियनचे राजनतिक संबंध अधिक जवळचे झाले, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान चीनमध्ये अधिक जवळीक झाली. ४ ते १० जानेवारी १९६६ मध्ये ताश्कंद येथे झालेली ही बठक संयुक्त राष्ट्रे, अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी आणि सोव्हिएत रशियन सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी यांच्या देखरेखीखाली झाली.

करारात काय ठरलं?

करारात ठरल्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तानने या युद्धात परस्परांच्या घेतलेल्या प्रदेशांवरील हक्कसोडून १९४९ साली नक्की केलेल्या युद्धबंदी रेषेपर्यंत माघार घेतली.

दुसऱ्याच दिवशी असं काही घडलं की…

ताश्कंदच्या या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी, ११ जानेवारी १९६६ रोजी एक दु:खद घटना घडली. भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन त्यांचे अकस्मात निधन झाले.