भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ५ हजार ७३४ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. देशभरात गेल्या २४ तासात करोनाचे ५४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १७ मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाले आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. ४७३ लोकांना आजपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं.

भारतात करोनाग्रस्तांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. देशभरात मागील २४ तासात ५४९ करोनाग्रस्त आढळले आहेत. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. देशभरातल्या रुग्णांची संख्या वाढणं चांगलं नाही ती आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. अशात ही संख्या वाढतानाच दिसते आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा, गरज असेल तर घरातून बाहेर पडा, बाहेर पडताना मास्क वापरा या आणि अशा सूचना आणि आवाहन सरकारकडून वारंवार केलं जातं आहे.

देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. अशात हा लॉकडाउन वाढण्याचीही शक्यता आहे. येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते लॉकडाउन पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय जाहीर करु शकतात.