News Flash

टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय

लडाखमधील संघर्षानंतर भारताने तात्पुरत्या स्वरुपातील बंदी घातली होती

संग्रहित

लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षानंतर भारताने घेतलेली अ‍ॅपबंदीची भूमिका अजून कठोर करण्यात आली आहे. भारताने काही चिनी अ‍ॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपासाठी बंदी घातली होती. मात्र आता ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये TikTok, Baidu, WeChat, UC Browser, Club Factory, Mi Video Call (Xiaomi) आणि BIGO Live अशा अनेक मोठ्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

या अ‍ॅप्सवर केंद्र सरकारकडून याआधीच बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे. गतवर्षी जूनच्या अखेरीस केंद्र सरकारने ज्या २६७ चिनी अ‍ॅप्सवर कारवाई केली होती त्यामध्ये यांचाही समावेश होता. आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत केंद्र सरकारने चिनी अ‍ॅप्सविरोधात कारवाई केली होती. या अ‍ॅप्सकडून भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मकता तसंच सुरक्षेला धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने डेटा गोळा करणं, त्याची प्रक्रिया, सुरक्षा असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यांची उत्तर देण्यात कंपन्या असमर्थ ठरल्याने कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये SHAREit, Likee, Weibo आणि शाओमीच्या Mi Community यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

भारत-चिनी सैनिकांत पुन्हा चकमक

लडाख संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर भारतीने चिनी अ‍ॅप्सविरोधात कारवाईला सुरुवात केली होती. भारतविरोधी कारवायांसाठी चीन अ‍ॅप्सच्या माध्यातून डेटाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर केंद्र सरकारने कंपन्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थि केले होते. पण त्यांची योग्य उत्तरं न मिळाल्याने कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारत-चिनी सैनिकांत पुन्हा चकमक
भारतील जवान आणि चीनी सैनिकांत सिक्कीममधील नाकुला भागात २० जानेवारीला किरकोळ चकमक झाली. परंतु दोन्ही देशांच्या कमांडर पातळीवर हा पेच सोडवण्यात आला, अशी माहिती भारतील लष्कराने सोमवारी दिली.

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार मात्र या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले आहेत. चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता, पण भारतीय लष्कराने त्यांना रोखले. त्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांत किरकोळ चकमक झाली, असे उत्तर सिक्कीममध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या घटनांची माहिती असलेल्या नागरिकांनी सांगितले. नाकुला येथे गेल्या वर्षी ९ मे रोजी चकमक झाली होती. तेथेच या वेळी पुन्हा चकमक झाल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 8:32 am

Web Title: 59 chinese apps permanantly banned in india sgy 87
Next Stories
1 भारताने शेजाऱ्यांना मदत केल्याने चीनचा तीळपापड; ‘कोव्हिशिल्ड’बद्दल पसरवू लागला चुकीची माहिती
2 भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, एका पायलटचा मृत्यू
3 गिरीश प्रभुणे, सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री
Just Now!
X