News Flash

औषधांवरील साडेसहा कोटींचा कर माफ; मुंबईतील चिमुकलीला पंतप्रधान मोदींनी केली मदत

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

(फोटो सौजन्य : ट्विटरवरुन साभार)

मुंबईतील एका पाच महिन्यांच्या बालिकेच्या उपचारासाठी आवश्यक औषधी अमेरिकेतून आयात करण्यासाठी लागणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहेत. तातडीने हा निर्णय घेतल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात माहिती फडणवीस यांनी पत्राचा फोटो पोस्ट करत दिली आहे.

तिरा कामत या मुंबईतील पाच महिन्यांची बालिकेला जीन रिप्लेसमेंट उपचारांची नितांत गरज आहे. तिच्या या उपचारांसाठी लोकांनी क्राऊड फंडींगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. क्राऊड फंडींगच्या माध्यमातून सुमारे १६ कोटी रूपये गोळा करण्यात आले आहेत. पुढील उपचारासाठी ‘झोलजेन्स्मा’ हे औषध अमेरिकेतून भारतामध्ये आयात करावे लागणार होते. मात्र हे औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसह सुमारे साडेसहा कोटी रूपये आणखी खर्च येणार होता. त्यामुळे पालकांनी त्यातून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला.

पालकांच्या मागणीनंतर तिरा कामतच्या उपचारासाठी अमेरिकेतून मागवण्यात येणाऱ्या औषधाला करांतून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यासंबंधीची विनंती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश देताच, तातडीने त्यावर कार्यवाही झाली आणि त्यानुसार, मंगळवारी नऊ फेब्रुवारीला या औषधीपुरता सर्व कर माफ करणारा आदेश वित्त विभागाने जारी केला.

पंतप्रधानांनी अतिशय संवदेनशीलतेने पुढाकार घेत त्वरेने कारवाई केल्यामुळे निश्चितपणे तिरा कामत हिचे प्राण वाचतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणामध्ये तातडीने लक्ष घातल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार सुद्धा मानले आहेत. तिरा कामत हिला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छाही फडणवीस यांनी दिल्या आहेत. या करमाफीमुळे तिरावरील उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार असून तिच्या पालकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 10:55 am

Web Title: 6 and half crore tax waved off by central government for five month old teera kamat with spinal muscular dystrophy gene therapy scsg 91
Next Stories
1 समजून घ्या : एप्रिलपासून पगारदारांना बसणार दुहेरी फटका?; बजेटमधील ‘या’ घोषणेमुळे होणार नुकसान
2 Budget 2021: काळे कपडे घालून संसदेत पोहचले ‘ते’ दोन खासदार
3 भारतातील एक हजारहून अधिक बंधारे धोकादायक; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
Just Now!
X