News Flash

शौचालयाच्या टाकीत गुदमरून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

१६ वर्षाच्या मुलाला वाचवण्यासाठी आत उतरले होते.

प्रतिकात्मक छायाचित्र

शौचालयाच्या टाकीत गुदमरून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा पैकी चार जणांचा मृतू जागीच झाला होता. तर अन्य दोघांना रूग्णालयात उपचारादरम्यान झाला. बिहारमधील पूर्वी चंपारणच्या जीतपुर गांवामध्ये काल गुरूवारी सकाळी ही घटना घडली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर आज हे प्रकरण समोर आले आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, दिनेश महतो यांच्या घरी शौचालयाची नवीन टाकी बसवण्यात आली होती. सकाळी त्यांचा मुलगा मोहन महतो टाकीचे शटर उघडण्यासाठी आत उतरला. पण, २० मिनीट झाले तरी तो बाहेर आला नाही. हे पाहून दिनेश महतोही टाकीमध्ये उतरले. वडिल-मुलगा दोघेही टाकीत अडकले. खूपवेळ झालेतरी नवरा आणि मुलगा बाहेर न आल्याचे पाहून दिनेशची पत्नीही आत उतरली. पण दुर्देव ऐवढे की तिही आतच अडकली. तिघे आतमध्ये अडकले त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यावेळी दिनेश यांचा दुसरा मुलगा वसंतही आत उतरला आणि तोही टाकीमध्ये अडकला.

चारही सदस्य अडकल्याचे पाहून कुटुंबात गोंधळ आणि भितीचे वातावरण निर्माण झाले. या चार जणांना वाचवण्यासाठी दिनेश यांचा पुतण्या सचिन आणि त्याचा मित्र सरोज मुखिया आतमध्ये उतरले. शौचालयाच्या टाकीमध्ये ऑक्सिजनची कमी असल्यामुळे गुदमरून चार जणांनी जागेवरच दम तोडला. या दुर्घेटनेची माहिती मिळाताच गावकऱ्यांनी सर्वांना बाहेर काढले. तात्काळ दोन जणांना रूग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 11:19 am

Web Title: 6 pepople dead to save a 16 year old boy follen in toilet tank
Next Stories
1 ट्रॅफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय
2 पाकिस्तानी जेलमधून ३६ वर्षांनी होणार भारतीयाची सुटका
3 मसूद अझहरचा पुतण्या व ‘जैश’चा टॉप कमांडर भारतात, सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट
Just Now!
X