सहा राफेल लढाऊ जेट विमानांची पहिली तुकडी भारताला २७ जुलैपर्यंत मिळण्याची शक्यता असून, यामुळे भारतीय हवाई दलाची लढाऊ क्षमता अधिक उंचावण्याची अपेक्षा आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २ जूनला त्यांच्या फ्रान्सच्या समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. फ्रान्समधील करोना महासाथीचा परिणाम न होता राफेल जेट विमाने ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारताला दिली जातील, असे या वेळी त्यांनी सांगितले. या विमानाची पहिली स्क्वाड्रन हवाई दलाच्या सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या तळांपैकी अंबाला हवाई दल स्थानकात तैनात केली जाईल.