28 February 2021

News Flash

प्रियकरासोबत आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिल्याची भीती ! आईने स्वतःच्याच मुलाला संपवलं

प्रियकर आणि आई पोलिसांच्या ताब्यात, गुजरातमधील घटना

आपल्याच मुलाने प्रियकरासोबत आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिल्यामुळे २६ वर्षीय आईने आपल्या ६ वर्षीय मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या केली आहे. गुजरातच्या बंस कंठा जिल्ह्यातील मेहमदपूर गावात शनिवारी ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश ठाकोर या सहा वर्षीय मुलाने आपल्या आईला तिच्या प्रियकरासोबत शेतात आक्षेपार्ह परिस्थिती पाहिलं होतं. आई राजुल आणि तिचा प्रियकर संजयने जगदीशला याबद्दल कोणालाही सांगू नको अशी ताकीद दिली होती. मात्र जगदीशने घरी जाऊन या घटनेबद्दल आपल्या वडिलांना सांगितलं.

शनिवारी सकाळी जगदीश घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याचा शोध सुरु केला. त्याचा शोध घाताना जगदीश बालसन रोडवर रक्ताच्या थारोळ्यात मृत पडलेला त्याच्या वडिलांना दिसला. या घटनेनंतर जगदीशने वडील ललित यांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात आपली पत्नी व प्रियकराविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

ललितने दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींची करोना चाचणी झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. शुक्रवारी जगदीशने आपल्याला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं होतं. आपल्या पत्नीचे संजयसोबत अनैतिक संबंध असल्याचा आपल्याला आधीपासूनच संशय होता अशी माहिती मुलाचे वडील ललित यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 7:15 pm

Web Title: 6 year old boy abducted murdered after he saw mother in compromising position with lover psd 91
Next Stories
1 जगातील १० टक्के लोकसंख्येला करोनाची लागण झाल्याचा WHO चा अंदाज
2 १५ ऑक्टोबरपासून उघडणार शाळा, शिक्षण मंत्रालयाने लागू केल्या गाइडलाइन्स
3 त्याने गर्लफ्रेंडच्या घरातच काचेच्या तुकड्याने गळा चिरुन संपवलं जीवन
Just Now!
X