02 December 2020

News Flash

पंजाबच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराबाबत राहुल गांधी गप्प का?-निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींना विचारला प्रश्न

पंजाबमधील होशियारपूर या ठिकाणी सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न झाला. या घटनेबाबत राहुल गांधी शांत का बसले आहेत असा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विचारला आहे. जेव्हा हाथरसमध्ये बलात्कार आणि हत्याकांड झालं त्यावेळी राहुल गांधी राजकारण करण्यासाठी तिथे गेले होते. मात्र काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये जेव्हा एका छोट्या मुलीवर बलात्कार झाला तेव्हा राहुल गांधी शांत बसले का बसले आहेत? असा प्रश्न निर्मला सीतारामन यांनी विचारला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “मला काँग्रेस पक्षाला विचारायचं आहे की जिथे तुमचं सरकार नाही तिथे बलात्कार झाला तर तुम्ही बहीण-भाऊ कारने त्या ठिकाणी जाऊन पिकनिकसारखं प्रदर्शन करता. पंजाबच्या होशियारपूरमध्ये बलात्कारची घटना घडली, एका मुलीची हत्याही झाली. तरीही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी शांत का आहेत? प्रत्येक घटनेवर ट्विट करणारे राहुल गांधी होशियारपूरबाबत शांत का बसले आहेत? पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे म्हणून ते गप्प बसलेत का?”

फक्त निर्मला सीतारामनच नाही तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी एवढ्या कळकळीने हाथरसला गेले होते. आता होशियारपूरमध्ये घडलेल्या घटनेबाबत राहुल गांधी गप्प का बसले आहेत? ही घटना घडून तीन दिवस झालेत तरीही राहुल गांधी तिथे का गेलेले नाहीत? असं प्रकाश जावडेकर यांनी विचारलं आहे.

पंजाबच्या होशियारपूरमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेहही जाळण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणातल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 5:54 pm

Web Title: 6 year old dalit girls rape murder in punjab doesnt shake their conscience sitharamans swipe at rahul and priyanka scj 81
Next Stories
1 धर्माच्या नावावर आमच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरतील – फारुख अब्दुल्ला
2 मोठी बातमी! केंद्र सरकारचा दिलासा, कर्जदारांना चक्रवाढ व्याज मिळणार परत
3 करदात्यांना मोठा दिलासा! आयकर भरण्याची तारीख वाढवली
Just Now!
X