पॅरिसवर दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी आयसिसने लंडन, बर्लिन यासाह पाच शहरांवर हल्ला करण्यासाठी ६० जिहादी तैनात केले होते, असे माध्यमांतील वृत्तांवरून स्पष्ट होत आहे.
पॅरिसवर १३ नोव्हेंबर रोजी दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी पाश्चिमात्य गुप्तचर यत्रणांना मिळालेल्या माहितीवरून सूचित होते की, अबू मोहम्मद अल-अदानी हा या कटमागील मुख्य सूत्रधार आहे.
युरोपला पाठविण्यासाठी आयसिसने ६० जिहादी तयार केले असून त्यांच्यावर पाच शहरांवर हल्ले करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती आणि ते युरोपमध्ये पोहोचले असल्याची माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
लंडन, पॅरिस, बर्लिन आणि बेल्जियममधील मोठे लोकसंख्या असलेले शहर यांच्यावर हल्ले करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सूचित होत आहे. मात्र या शहरांवर एकाच वेळी हल्ले करण्याबाबतची माहिती मिळू शकली नाही.