25 February 2021

News Flash

करोना लसीची भीती कायम! ६० टक्के भारतीयांच्या मनात संशयकल्लोळ

लसीच्या दुष्परिणामांची भीती

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य : रॉयटर्स)

लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यानंतर देशात करोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. सध्या कोविड योद्ध्यांना लस दिली जात आहे. तर दुसरीकडे लसीच्या सुरक्षिततेवरून वाद निर्माण झाल्यानं लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती कायम असल्याचं एका पाहणीतून समोर आलं आहे. लोकल सर्कलनं केलेल्या पाहणी ६० टक्के भारतीयांच्या मनात लसीबद्दल भीतीचं प्रश्नचिन्ह कायम आहे.

या पाहणीतून असं दिसून आलं की, ६० टक्के भारतीय तात्काळ लस घेण्याच्या तयार नाहीत. करोना लसीचे साईड इफेक्ट आणि अनेक जणांना त्रास झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हळूहळू ही भीती कमी होत असली, तरी अजूनही ६० लोक लस घेण्यास का कू करत असल्याचं पाहणीतून दिसून आलं.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या पाहणी ५९ नागरिकांनी लस घेतल्यामुळे कोणते दुष्परिणाम उद्धभवू शकतात हे कळू शकत नसल्याचं कारण दिलं. लसीच्या परिणामकारकेतेबद्दल संशय असल्यानेच लोक लस घेण्यास घाबरत असल्याचं दिसून आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे चार टक्के लोकांनी लस घेण्यास नकार दिला आहे. करोना नष्ट झाला असून, लस घेण्याची गरज नसल्याचं या नागरिकांनी म्हटलं आहे.

पाहणीत तात्काळ लस घेण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आपण अगोदरच लस घेतल्याचं ३६ टक्के लोकांनी सांगितलं. तर जेव्हा खासगी रुग्णालय वा इतर माध्यमातून जेव्हा लस उपलब्ध होईल, तेव्हा आपण घेऊ असं ४ टक्के लोकांनी या पाहणीत म्हटलं आहे. लोकल सर्कलने २१ जानेवारी २०२१ रोजी हा पाहणी अहवाल प्रसिद्ध केला आहे. बहुतांश लोकांनी लसीच्या सुरक्षिततेवर आणि होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2021 1:02 pm

Web Title: 60 percent indians still hesitant towards covid19 vaccine shows survey bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 कुलगाममध्ये दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात चार जवान जखमी
2 पोलिसांची गोळी लागल्याने नव्हे तर ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू, बघा थरारक CCTV फुटेज
3 दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी लक्खा सिधानाचंही नाव समोर
Just Now!
X