News Flash

…म्हणून ६०० भारतीय विद्यार्थी अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात

अमेरिकेत शिक्षणाला जायचा विचार असेल तर कागदपत्रांची पूर्तता आवश्यक

शिक्षण किंवा नोकरीसाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याठिकाणी असणाऱ्या संधींमुळे तरुणांचा अमेरिकला जाण्याकडे कल आहे. मात्र नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ६०० भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इमिग्रेशनचे नियम मोडल्याच्या कारणावरुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. US Immigration and Customs Enforcement agency ने केलेल्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकन तेलगु असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.

योग्य त्या परवानगीशिवाय देशात राहणाऱ्या विविध देशातील विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये भारतातील ६०० जणांचाही समावेश असल्याचे समोर आले. अमेरिकेत ज्या संस्थेने ही कारवाई केली त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटद्वारे याबाबतची माहिती दिली. मातृभूमी सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फ्रेमिंगचन हिल्स भागात बनावट विद्यापीठाची निर्मिती करुन परदेशी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

अमेरिकन तेलगु असोसिएशनशी निगडित असलेले विद्यार्थी आणि त्यांचे मित्रमंडळी यांच्याकडून ही गोष्ट समजली. यापुढे नेमके काय करायचे यासाठी अमेरिकेतील काही भारतीय संघटना आणि तेलगु असोसिएशन भारतीय विद्यार्थ्यांना मदत करत आहेत. या सर्व आरोपांतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचे काम सुरु आहे. यामध्ये अनेक तांत्रिक मुद्दे असल्याने ही गुंतागुंत सोडवण्यासाठी काही कालावधी जावा लागेल असे सांगण्यात येत आहे. परदेशात असणाऱ्या भारतीय दूतावासामार्फत या विद्यार्थ्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी वेगाने हालचाली सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 2:18 pm

Web Title: 600 indian students detained in us for immigration rules violation
Next Stories
1 Jind Bypoll: भाजपा आघाडीवर, काँग्रेस म्हणते, हा तर ईव्हीएम घोटाळा
2 परीक्षा पाहू नका, हिंदूंचा संयम कधीही सुटू शकतो- केंद्रीय मंत्री
3 बेलवर असणारे जेलमध्ये नक्की जाणार, नरेंद्र मोदींचा गांधी कुटुंबीयांवर निशाणा
Just Now!
X