थायलंडच्या उत्तरेकडील भागांत असलेल्या म्यानमार निर्वासितांच्या छावणीला लागलेल्या भीषण आगीत किमान ६२ निर्वासित मृत्युमुखी पडले असून २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
माई हाँग सॉन प्रांतातील माई सुरीन छावणीला शुक्रवारी सांयकाळी भीषण आग लागली. त्यामध्ये ३० निर्वासित मृत्युमुखी पडल्याचे प्रथम सांगण्यात आले होते. मात्र त्यांनतर आणखी ३२ जणांचे मृतदेह मिळाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यापैकी बहुसंख्य निर्वासित गुदमरल्याने मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येत आहे. म्यानमारमधील करेन अल्पसंख्य समाजातील तीन हजारांहून अधिक निर्वासित या छावण्यांमध्ये वास्तव्याला होते.