News Flash

देशात आढळले ६२,२०८ नवीन करोना रुग्ण, २,३३० रुग्णांचा मृत्यू

नवीन करोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे.

या चौथ्या सेरो सर्वेत ६ ते १७ वर्षे वयोगटतील मुलांचा देखील समावेश करण्यात आला होता.(संग्रहीत फोटो)

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक वातावरण आहे. नवीन करोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र करोनामुळे मृतांची संख्या अद्याप चिंतेचे कारण आहे. बुधवारच्या तुलनेत देशात नवीन करोना रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात गेल्या २४ तासात ६२,२०८ नवीन करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर १,०३,५७० जणांनी करोनावर मात केली आहे. तसेच २,३३० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार देशातील करोनाची परीस्थिती आटोक्यात येत आहे. आतापर्यंत देशात २,९७,००,३१३  रुग्ण आढळले आहेत. तर २,८४,९१,६७० बाधितांनी करोनावर मात केली आहे. ३,८१,९०३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात ८,२६,७४० बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा- जाणून घ्या : Paytm वरुन लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग कसं करावं

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीतकरण सुरु आहे. आतापर्यंत देशात २६,५५,१९,२५१ जणांना लस देण्यात आली आहे.

 १८ ते ४४ वयोगटासाठी मोफत लसीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ ते ४४ वयोगटासाठी देखील मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली होती. यासाठी केंद्र सरकारच लस खरेदी करून ती राज्य सरकारांना पुरवणार असून एकूण ७५ टक्के लसींचे डोस केंद्र सरकार तर २५ टक्के लसीचे डोस हे खासगी क्षेत्रामध्ये विक्री होतील, अशी देखील घोषणा पंतप्रधानांनी केली होती. त्यानुसार आता केंद्र सरकारने मोफत लसीकरणाची तयारी सुरू केली असून त्यासाठी लसीच्या तब्बल ७४ कोटी डोसची ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे. यामध्ये कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि बायोलॉजिकल ई या तीन प्रकारच्या डोसचा समावेश आहे. निती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी यासंदर्भात दुपारी पत्रकार परिषदेत घोषणा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 9:55 am

Web Title: 62208 new covid patients were found in the country 2330 patients died srk 94
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 पश्चिम बंगाल : भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता; दोन खासदारांसहीत २५ ते ३० आमदार तृणमूलच्या वाटेवर?
2 ट्विटर अडचणीत!
3 लसमात्रांतील अंतर शास्त्रीय आधारावरच
Just Now!
X