21 September 2020

News Flash

देशात २४ तासांत ६२,५३८ रुग्ण

रुग्णसंख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर

संग्रहित छायाचित्र

देशभरात आत्तापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन करोना रुग्णवाढ नोंदवली गेली असून चोवीस तासांमध्ये ६२ हजार ५३८ रुग्णांची भर पडली. एकूण करोना रुग्णसंख्या २० लाख २७ हजार ७४ वर पोहोचली आहे. रुग्णसंख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असून अमेरिकेत ही संख्या ४७.२८ लाख तर, ब्राझीलमध्ये २८.०१ लाखांवर गेली.

भारतात प्रतिदिन वाढ सातत्याने ५० हजारांहून अधिक होत असल्याने देशातील रुग्णसंख्या ब्राझीललाही मागे टाकू शकेल. १५ लाख ते २० लाख अशी पाच लाखांची वाढ केवळ नऊ दिवसांमध्ये झाली आहे. पहिले १ लाख रुग्ण ७८ दिवसांमध्ये नोंदवले गेले. त्यानंतर ५, १०, १५ व २० लाख असा प्रत्येक पाच लाखाचा टप्पा अनुक्रमे ३९, २०, १२ आणि आता नऊ दिवसांमध्ये ओलांडला गेला.

गेल्या चोवीस तासांमध्ये ८८६ मृत्यू झाले असून एकूण मृतांचा आकडा ४१ हजार ५८५ वर पोहोचला आहे. मृत्युदर २.०५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जुलै महिन्याच्या पूर्वार्धात मृत्युदर ३ टक्क्यांपेक्षा जास्त होता. करोनामुक्त रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा ७.७ लाखांनी जास्त आहे. एकूण १३ लाख ७८ हजार १०५ रुग्ण करोनामुक्त झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६८ टक्क्यांवर गेले आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ४९ हजार ७६९ रुग्ण बरे झाले. ६ लाख ७ हजार ३८४ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या सात दिवसांतील सरासरी करोनामुक्त रुग्णांची संख्या ४४ हजारांपर्यंत गेली असून त्याच्याआधीच्या आठवडय़ात ती २६ हजार होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 1:03 am

Web Title: 62538 patients in 24 hours in the country abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 मशिदीच्या पायाभरणीस जाणार नाही – आदित्यनाथ
2 विमान कोसळले
3 संशोधन, विश्लेषणातून विद्यार्थ्यांचे शिक्षण!
Just Now!
X