26 February 2021

News Flash

Coronavirus  : एका दिवसात ६४,३९९ रुग्ण

देशात २४ तासांत सात लाख चाचण्या; करोनामुक्तांचे प्रमाण ७० टक्क्यांच्या उंबरठय़ावर

| August 10, 2020 04:25 am

देशात २४ तासांत सात लाख चाचण्या; करोनामुक्तांचे प्रमाण ७० टक्क्यांच्या उंबरठय़ावर

नवी दिल्ली : देशात रविवारी रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदविण्यात आला. गेल्या २४ तासांत ६४,३९९ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या २१ लाख ५३ हजारांवर पोहोचली आहे. मात्र, देशातील करोना चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले असून, गेल्या २४ तासांत सात लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या.

देशात आतापर्यंत २ कोटी ४१ लाख ६ हजार ५३५ इतक्या चाचण्या करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. गेल्या २४ तासांत करोनाचे ५३,८७९ रुग्ण बरे होऊन घरी गेल्यामुळे बरे झालेल्या करोना रुग्णांची संख्या १४,८०,८८४ इतकी झाली आहे. देशातील करोनामुक्तांचे प्रमाण ६८.७८ टक्के झाले आहे.

दैनंदिन चाचण्यांची संख्या वेगाने वाढत असून, गेल्या अनेक दिवसांपासून देशात ६ लाखांहून अधिक नमुने तपासले जात आहेत, अशी माहिती मंत्रालयाने दिली. गेल्या २४ तासांत विक्रमी ७ लाख १९ हजार ३६४ नमुने तपासण्यात आले असून आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे, असे आयसीएमआरचे शास्त्रज्ञ आणि माध्यम समन्वयक डॉ. लोकेश शर्मा यांनी सांगितले.

मृत्युप्रमाण २ टक्क्यांवर : देशात गेल्या २४ तासांत ८६१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ४३,३७९ वर पोहोचली आहे. मात्र, देशातील मृत्युप्रमाण २.०१ टक्क्यांवर घसरले आहे. इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

सर्वाधिक रुग्णवाढ; पण.. गेल्या तीन दिवसांपासून भारतात ६० हजारांहून अधिक रुग्णवाढ  होत आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत ही रुग्णवाढ सर्वात जास्त आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत ती कमी आहे.

राज्यात १२,२४८ नवे बाधित

मुंबई  : करोनामुळे राज्यात गेल्या २४ तासांत ३९० जणांचा मृत्यू झाला तर १२,२४८ नव्या रुग्णांचे निदान झाले. पुण्याबरोबरच नाशिकमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 4:25 am

Web Title: 64399 new covid cases recorded across india zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 संरक्षण साहित्याच्या देशांतर्गत निर्मितीला चालना देण्याचे आव्हान
2 केरळमधील भूस्खलनातील बळींची संख्या ४३ वर
3 राम मंदिराच्या घंटानिर्मितीत हिंदू-मुस्लीम कारागीर
Just Now!
X