21 September 2020

News Flash

देशात २४ तासांत ६४,५५३ रुग्ण

एकूण मृत्यूचा आकडा ४८ हजार ४० वर

(संग्रहित छायाचित्र)

देशात गेल्या चोवीस तासांमध्ये ६४ हजार ५५३ करोना रुग्णांची नोंद झाली असून १००७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील एकूण करोना रुग्णांची संख्या २४ लाख ६१ हजार १९० झाली असून एकूण मृत्यूचा आकडा ४८ हजार ४० वर पोहोचला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

गेल्या चोवीस तासांमध्ये ५५ हजार ५७३ रुग्ण करोनामुक्त झाले असून एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या १७ लाख ५१ हजार ५५५ झाली आहे. उपचाराधीन रुग्ण ६ लाख ६१ हजार ५९५ आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१७ टक्क्यांवर आले असून मृत्युदर १.९५ टक्क्यांवर आला आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये ८ लाख ४८ हजार ७२८ इतक्या विक्रमी नमुना चाचण्या केल्या गेल्या. एकूण २.७६ कोटी चाचण्या झाल्या आहेत. १० लाख लोकसंख्येमागे प्रतिदिन सरासरी ६०३ चाचण्या घेतल्या जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार हे प्रमाण १४० चाचण्या इतके असणे गरजेचे आहे. ३४ राज्यांमध्ये प्रतिदिन राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त चाचण्या होत आहेत.

अमित शहा यांची चाचणी नकारात्मक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची करोना नमुना चाचणी नकारात्मक आली असून डॉक्टरांनी त्यांना घरगुती विलगीकरणाचा सल्ला दिला आहे. ही माहिती शहा यांनी ट्वीटद्वारे दिली. गेल्या आठवडय़ात करोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्यानंतर शहा खासगी रुग्णालयात भरती झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:24 am

Web Title: 64553 patients in 24 hours in the country abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 रिझव्‍‌र्ह बँकेचा सरकारला टेकू
2 विस्तारवादी दु:साहस हाणून पाडू!
3 गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला
Just Now!
X