News Flash

दिल्ली-मुंबई विमानात छेडछाड, ६५ वर्षीय उद्योगपतीला अटक

दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या विमानात हा प्रकार घडला आहे.

विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात ४१ वर्षाच्या महिलेची छेडछाड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. फ्लाइट क्रमांक UK 995 दिल्लीहून मुंबईकडे येणाऱ्या विमानात हा प्रकार घडला आहे. भारतीय वंशाची सिंगापूर येथे राहणारी ४१ वर्षीय महिला मुंबईतील नातेवाईकांना भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी दिल्ली-मुंबई विमानामध्ये हा प्रकार घडला आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर पीडित महिलेने थेट सहार पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून याप्रकरणी पोलिसांनी ६५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. आरोपीचे नाव अनिल कुमार मूलचंदानी असे आहे.

सोमवारी दिल्लीहून मुंबईला निघालेल्या विमानात दिल्लीचा उद्योगपती अनिल कुमार मुलचंदानी माझ्याकडे चूकीच्या पद्धतीने पाहत होता. प्रवासादरम्यान मला चूकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यानंतर याप्रकरणी मी एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्सकडे तक्रार केली. क्रू मेंबर्संनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही घटना सांगितली, असा जबात पोलिसांत पीडित महिलेने नोंदवला आहे. एका पोलिस आधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी अनिल कुमार मुलचंदानी यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. आरोपी अनिल कुमार मुलचंदानी यांना त्या महिलेने दोनवेळा समज दिल्यानंतरही त्यांनी तिच्याशी छेडछाड केल्याचे सांगण्यात आले.

दिल्ली मुंबई विमानात झालेल्या या सर्व प्रकरणात एअरलाइन्सचे अधिकारी पोलिसांना सहकार्य करत असल्याचे विस्तारा एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 10:44 am

Web Title: 65 year old businessman arrested for molesting woman in flight
Next Stories
1 Rafale Deal: राहुल गांधींना भाजपाची शिकवणी
2 आधी उडवली खिल्ली, आता अफगाणिस्तानात सहकार्यासाठी ट्रम्प यांची मोदींशी चर्चा
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X