गेल्या २४ तासांत ६७,७०८ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या ७३ लाखांहून अधिक झाली आहे. आतापर्यंत ६३ लाख ८३ हजार ४४१ रुग्ण बरे झाल्याने, करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण गुरुवारी ८७.३५ टक्के झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

करोनाबाधितांची एकूण संख्या गुरुवारी ७३,०७,०९७ इतकी झाली, तर २४ तासांत ६८० जण मृत्युमुखी पडल्याने करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ लाख ११ हजार २६६ झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी घटून १.५२ टक्क्य़ांवर आली आहे.

एकूण रुग्ण किती? : देशात सध्या करोनाचे ८,१२,३९० रुग्ण असून, ही संख्या एकूण करोनाबाधितांच्या ११.११ टक्के आहे.