24 November 2020

News Flash

राजपथावर लष्करी सामर्थ्याचे दर्शन

१० देशांचे राष्ट्रप्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

राजपथावरील संचलनात यंदाचं प्रमुख आकर्षण ठरल्या त्या सीमा सुरक्षा दलातील महिला जवानांचे पथक

देशभरात ६९ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून दिल्लीतील राजपथावर संचलन पार पडले.. देशाच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले असून आसियान (असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स) या आग्नेय आशियातील १० देशांचे राष्ट्रप्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भारताचे लष्करी सामर्थ्य, संस्कृती आणि विविधतेचे दर्शन आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर घडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी इंडिया गेटवर अमर ज्योती येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या प्रसंगी उपस्थित होते.

राजपथावरील संचलनात यंदा प्रमुख आकर्षण ठरणार आहे ते सीमा सुरक्षा दलातील महिला जवानांचे पथक. दुचाकीवर चित्तथरारक कसरती सादर करत त्या स्त्रीशक्तीचे झलकच दाखवणार आहेत. तसेच सैन्याच्या जवानांनी आसियान देशांचे ध्वज फडकावले. संचलनात कंबोडिया, मलेशिया, थायलंडमधील लोकनृत्यदेखील सादर करण्यात आली. नौदलातील स्वदेशी बनवटीची ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेची प्रतिकृतीदेखील संचालनात सादर करण्यात आली. ऑल इंडिया रेडिओ, आयकर विभाग, कृषी विभाग अशा विविध विभागांचे चित्ररथही यात सहभागी झाली होती. याशिवाय देशाच्या विविधतेचे दर्शन घडवणारे विविध राज्यांचे चित्ररथही संचालनात सहभागी झाली होती. महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारला होता. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

UPDATES:

* हवाई दलाच्या सामर्थ्याचे दर्शन

* आकाशवाणीचा चित्ररथ

*  बीएसएफच्या महिला जवानांच्या चित्तथरारक कसरती

* ब्राह्मोस क्षेपणास्त्र

* राजपथावर आसियान देशांचे ध्वज

* हवाई दलातील कमांडो जे.पी. निराला यांना अशोकचक्र, बंदिपोरामधील चकमकीत झाले होते शहीद. निराला यांच्या पत्नी आणि मातोश्रीने स्वीकारले अशोक चक्र

* अमर ज्योती जवान येथे नरेंद्र मोदी श्रद्धांजली अर्पण करताना

Next Stories
1 चीनचा डोकलामवर पुन्हा दावा!
2 आसियान मूल्यांचा भारताला आदर – मोदी
3 अमेरिकेतील डॉक्टरला १७५ वर्षे तुरुंगात राहण्याची शिक्षा
Just Now!
X