जपानच्या पूर्व किनाऱ्याला भूकंपाचा तीव्र झटका बसला आहे. आज (शनिवारी) पहाटे २.१०  मिनिटांनी हा झटका जाणवला. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय संशोधन खात्याकडे या भूकंपाची तीव्रता ७.३ रिश्‍टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. या भूकंपानंतर ४० सेंटीमीटर उंचीची त्सुनामी आल्याचे वृत्त आहे. या भूकंपात तसेच त्सुनामीत जीवित वा वित्तहानी झाल्याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नसून सावधगीरी म्हणून तातडीने फुकुशिमा अणुकेंद्र खाली करण्यात आले आहे.
राजधानी टोकीयोतही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.  कुशिमा अणू प्रकल्पाला कोणताही धोका नसला तरी सावधगीरी म्हणून हे अणुकेंद्र बंद करण्यात आले आहे. तेथील कर्मचाऱ्यांना माघारी बोलावण्यात आले आहे.  समुद्रात आलेल्या भूकंपानंतर तासाभराने इशिनोमाकी किनाऱ्यावर समुद्राच्या मोठ्या लाटा धडकू लागल्या. त्यामुळे तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रीय झाली असून, किनारपट्टी भागात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
(संग्रहित छायाचित्र)