News Flash

आम्रपाली एक्सप्रेसचे सात डब्बे रुळावरुन घसरले

आम्रपाली एक्स्प्रेसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

बिहारच्या खागरीया जिल्ह्यामध्ये रविवारी पहाटे कटिहार ते अमृतसर जाणा-या आम्रपाली एक्सप्रेसला अपघात झाला. कटीहारच्या दिशेने जाणा-या आम्रपाली एक्सप्रेसचे सात डब्बे आज रुळावरुन घसरले. खागरीया जिल्ह्यात पसरहा स्थानकाजवळ हा अपघात झाला.
आम्रपाली एक्स्प्रेसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. आम्रपाली एक्सप्रेसचे पाच स्लीपर आणि दोन वातानुकूलित डब्बे रुळावरुन घसरले. या अपघातामुळे राजधानी एक्सप्रेससह अन्य रेल्वेंचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वेचे प्रवक्ता अनिल सक्सेना यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 11:26 am

Web Title: 7 coaches of amrapali express derail in bihar
Next Stories
1 निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपी आज सुटणार
2 भारताविरोधात विधाने करू नका!
3 युरोपभर हल्ले करण्याचा आयसिसचा डाव
Just Now!
X