News Flash

फोर्ब्सच्या अमेरिकेतील अतिश्रीमंतांच्या यादीत सात भारतीय

जेफ बेझोस सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या स्थानावर

फोर्ब्सनं जगभरातील अतिश्रीमंत अमेरिकन नागरिकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सात भारतीय अमेरिकन नागरिकांना स्थान देण्यात आलं आहे. या यादीत सायबर सिक्युरिटी फर्म झेडस्केलरचे जय चौधरी हे ६१ व्या स्थानावर आहेत. तर सिम्फनी टेक्नॉलॉजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रमेश वाधवानी हे ३.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह २३८ व्या स्थानावर आहेत.

ऑनलाइन विक्री करणारी कंपनी वेयफेअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज शाह यांना फोर्ब्सच्या यादीत २९९ वं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे २.८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर सिलिकॉन व्हॅली व्हेंचर कॅपिटल फर्म खोसला व्हेंचर्सचे संस्थापक विनोद खोसला हे २.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ३५३ व्या स्थानावर आहेत. शेरपालो व्हेंचर्सचे मॅनिजिंग पार्टनर कवितर्क राम श्रीराम यांना या यादीत ३५९ वं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे २.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.

तर राकेश गंगवा यांना या यादीत ३५९ वं स्थान देण्यात आलं असून त्यांच्याकडे २.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. याव्यतिरिक्त वर्कडे चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक अनिल भुसरी यांनादेखील ३५९ वं स्थान देण्यात आलं असून त्यांच्याकडेही २.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. ४०० जणांच्या या यादीत सलग तिसऱ्या वर्षीही अॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे १७९ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर १११ अब्ज डॉलर्स संपत्तीसह बिल गेट्स यांना फोर्ब्सच्या यादीत दुसरं स्थान देण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 10:47 am

Web Title: 7 indian americans in forbes list of richest people in us jud 87
Next Stories
1 …तर सर्वांसमोर १०० उठाबशा काढेन, ममता बॅनर्जी यांचं थेट आव्हान
2 देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ओलांडला ४३ लाखांचा टप्पा; ८९ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद
3 सुशांतने मला ड्रग्स घेण्यासाठी बळजबरी केली; रियाचा खुलासा
Just Now!
X