वायू चक्रीवादळाचा धोका अद्यापही पुर्णपणे टळलेला नाही, त्यामुळे भारतीय रेल्वे विभागाने मुख्य रेल्वे मार्गावरील सात रेल्वे रद्द केल्या आहेत, तर अन्य पाच रेल्वे अल्पकाळासाठी रद्द केल्या आहेत.

चक्रीवादळ वायू हे गुजरातच्या द्वारकेकडे जात आहे, पोरबंदरसह आसपासच्या परिसरात वायू वादळाचा परिणाम जाणवत आहे. या अगोदरही दक्षता म्हणुन अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. वायू वादळामुळे गोव्यात मान्सून दाखल होण्यास उशीर होत आहे.

हवामान खात्याच्या अधिका-यांच्या मते वायू वादळाने गोव्याची सीमा पार केली आहे. आता ते गुजरातच्या पोरबंदरच्या दिशेने सरकत असून सोमनाथ, जुनागढ व द्वारका या भागांना या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अगोदर १२ ते १५ जून कालवधीत गोव्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता होती. मात्र वायू वादळामुळे मान्सून लांबणीवर पडल्याचे दिसत आहे.