21 September 2020

News Flash

म्हशीला धडकून बस नदीत कोसळली, १२ प्रवाशांचा मृत्यू, ४६ जखमी

नदीमध्ये बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४६ प्रवासी जखमी झाले आहेत. 

फोटो सौजन्य- ANI

नदीमध्ये बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४६ प्रवासी जखमी झाले आहेत.  ओदिशातील कटक जिल्ह्यातल्या जगतपूरमध्ये ही घटना घडली आहे. म्हशीला धडकून ही बस महानदी पुलावरून खाली कोसळली.  इतर प्रवाशांना वाचवण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

पुलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली. बस नदीत कोसळल्याची घटना घडली त्यानंतर तिथे लोकांची गर्दी जमा झाली. पोलीस आणि इतर लोकही या ठिकाणी जमले, बघ्यांचीही गर्दी झाली होती. आता या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी रूग्णवाहिकाही बोलावण्यात आल्या. त्यानंतर तातडीने लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 9:02 pm

Web Title: 7 people dead after a bus carrying around 30 passengers fell from the mahanadi bridge near jagatpur in cuttack today
Next Stories
1 वर्षात १०० सुट्ट्यांमुळे कर्नाटक सरकार चिंतेत 
2 जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन, सकाळी क्रॅश झालं होतं मेसेंजर
3 शीख दंगल : ३४ वर्षांनंतर एकाला फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा
Just Now!
X