News Flash

दिल्लीत सात वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार, रक्तबंबाळ अवस्थेत पोहोचली घरी

राजधानी दिल्लीत एका सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे

( प्रतिकात्मक छायाचित्र )

राजधानी दिल्लीत एका सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शाहदरा येथील सीलमपुरी परिसरात चिमुरडीवर बलात्कार झाला असून, पोलिसांनी याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने शेजाऱ्याने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मुलगी रात्री १०.३० वाजता बाहेर अंगणात खेळत असताना शेजाऱ्याने आपल्या मुलीला जवळच्या झाडीत नेऊन बलात्कार केला असा त्यांचा आरोप आहे.

मुलगी जेव्हा घरी परतली तेव्हा तिच्या शरिरातून रक्त वाहत होतं. चौकशी केली असता तिने घटनेची माहिती दिली. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विट करत घटनेची माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितलं की, आरोपी मुलीला पार्कात घेऊन गेला, तिच्या गुप्तांगात पाइप टाकला आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान पोलिसांनी गुप्तांगात एखादी वस्तू टाकण्यात आल्याचा दावा फेटाळला आहे. जखम झाल्याने गुप्तांगातून रक्त वाहत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मुलीला उपचारासाठी गुरु तेज बहादूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आरोपी कचरा वेचणारा असून पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली. दिल्ली महिला आयोगाने बलात्कार पीडितेला आर्थिक मदत मिळण्यासाठी निवेदन करणार असल्याचं सांगितलं आहे. स्वाती मालीवाल यांनी ट्विट केलं आहे की, ‘त्या चिमुरडीला होणारा त्रास शब्दांत सांगू शकत नाही. आधीच मुलगी कुपोषित आहे आणि आता तिला पुढेही संघर्ष करावा लागणार आहे. आम्ही कायदेशीर लढ्यासाठी तिला साथ देऊ आणि दोषीला मृत्यूदंडाची शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करु’.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 7:12 pm

Web Title: 7 year child raped in delhi
Next Stories
1 जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन आली ट्रॅकवर, ताशी वेग १४० किलोमीटर
2 जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत संशयित चोराचा मृत्यू
3 विजय मल्ल्या पळाला विदेशात, मोदी-जेटलींचे हातात हात!
Just Now!
X