News Flash

सलग १० महिने ‘करोना पॉझिटिव्ह’ राहिलेल्या ७२ वर्षांच्या आजोबांची करोनावर मात

ब्रिटनमधील एक ७२ वर्षीय वृद्ध सलग १० महिने 'करोना पॉझिटिव्ह' राहिले आहेत.

करोना विषाणूचा एक दुर्मिळ प्रकार नोंदला गेला आहे

करोना व्हायरस वेगवेगळे रुप दाखवत आहे. या रोगाने डॉक्टांना देखील चकमा दिला आहे. करोनाबाबत अने दुर्मिळ प्रकार आढळले आहेत. दरम्यान एक आश्चर्यकारक बातमी समोर आली असून करोना विषाणूचा एक दुर्मिळ प्रकार नोंदला गेला आहे. ब्रिटनमधील एक ७२ वर्षीय वृद्ध सलग १० महिने ‘करोना पॉझिटिव्ह’ राहिले आहेत. करोना संसर्गाचे आतापर्यंतचे हे सर्वाधिक लांब प्रकरण मानल्या जात आहे. गुरुवारी संशोधकांनी ही माहिती दिली.

वेस्ट इंग्लंडमधील ब्रिस्टल येथील सेवानिवृत्त ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर डेव्ह स्मिथ यांनी सांगितले की, “माझी ४३ वेळा करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यात माला सात वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले. मी माझी अंत्यसंस्काराची योजना देखील आखली होती. शेवटी हार मानून मी कुटूंबाला बोलावून सर्वांना निरोप दिला होता”, अशी माहिती त्यांनी बीबीसी टीव्हीला दिली.

शॅम्पेनची बाटली उघडून साजरा केला आनंद 

ब्रिस्टल अँड नॉर्थ ब्रिस्टल ट्रस्ट विद्यापीठाचे संसर्गजन्य रोग सल्लागार एड मोरन म्हणाले, “स्मिथ यांच्या शरीरात संपूर्ण काळ करोना व्हायरस सक्रिय होता. अमेरिकन बायोटेक फर्म रेगेनरॉनने विकसित केलेल्या सिंथेटिक अँटीबॉडीजच्या कॉकटेलने उपचार केल्यावर स्मिथ बरे होऊ शकले. त्यांची केस वेगळी असल्याने उपचार पद्धतीला परवानगी देण्यात आली होती. सध्या यूकेमध्ये ही पद्धत वैद्यकीयदृष्ट्या स्वीकारली जात नाही.

हेही वाचा- “तुमच्या या निर्णयामुळे एक जरी मृत्यू झाला तर…”, सर्वोच्च न्यायालयानं आंध्र प्रदेश सरकारला सुनावलं!

बीबीसीशी बोलतांना स्मिथ म्हणाले, ‘मला माझे जीवन परत मिळाले आहे.” दरम्यान, रेगेनरॉनचे औषध घेतल्यानंतर ४५ दिवसांनी आणि पहिल्यांदा पॉझिटिव्ह आल्याच्या ३०५ दिवसांनी त्यांचा करोना रीपोर्ट  निगेटिव्ह आला. त्यांनतर त्यांनी पत्नीबरोबर शॅम्पेनची बाटली उघडून आनंद साजरा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 6:14 pm

Web Title: 72 year old grandfather who remained corona positive for 10 months overcame the corona srk 94
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 यावर्षी नवी मुंबईत सुरू होणार JIO INSTITUTE; नीता अंबानी यांची घोषणा!
2 “तुमच्या या निर्णयामुळे एक जरी मृत्यू झाला तर…”, सर्वोच्च न्यायालयानं आंध्र प्रदेश सरकारला सुनावलं!
3 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा
Just Now!
X