कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशाला हादरवून सोडले. पहिल्या लाटेपेक्षा जास्त करोना रुग्ण दुसऱ्या लाटेत आढळले. तसेच मृत्यूंची संख्या देखील सर्वाधिक होती. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, दुसर्‍या लाटेत बिहारमध्ये सर्वाधिक ११५ डॉक्टरांचा मृत्यू झाला. यानंतर राजधानी दिल्ली दुसर्‍या क्रमांकावर आहे. देशात एकून ७७६ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमध्ये सर्वाधिक ११५ डॉक्टरांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत १०९ यानंतर उत्तर प्रदेशात ७९, पश्चिम बंगालमध्ये ६२, तामिळनाडूमध्ये ५०, आंध्र प्रदेशात ४०, आसाममध्ये १०, गुजरातमध्ये ३९ आणि झारखंडमध्ये ३९ डॉक्टरांचा मृत्यू झाला. याशिवाय मध्य प्रदेशात १६, महाराष्ट्रात २३, ओडिशामध्ये ३४, राजस्थानमध्ये ४४ आणि तेलंगणामध्ये ३७ डॉक्टरांचा मृत्यू झाला.

देशात सलग तिसऱ्या दिवशी आढळले ५० हजारापेक्षा अधिक रुग्ण

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४  तासांत ५१.६६७ नवीन करोनाचे रुग्ण आढळले. तसेच १,३२९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ६४,५२७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात ६,१२,८६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आतापर्यंत भारतात तीन कोटी ३ लाख ३४ हजार ४४५ रुग्ण आढळले. यापैकी दोन कोटी ९१ लाख २८ हजार २६७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर ६ लाख १२ हजार ८६८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तसेच ३ लाख ९३ हजार ३१० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.