महाराष्ट्रात ७ हजार ८६२ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील चोवीस तासात २२६ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर ५ हजार ३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला करोना रुग्णांची आत्तापर्यंतची संख्या २ लाख ३८ हजार ४६१ झाली आहे. यापैकी १ लाख ३२ हजार ६२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत करोनाची बाधा होऊन ९ हजार ८९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.

राज्यातील करोना रुग्णांचा मृत्यू दर हा ४.१५ टक्के इतका झाला आहे. आत्तापर्यंत १२ लाख ५३ हजार ९७८ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यापैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ६ लाख ७४ हजार २५ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ४६ हजार ५६० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

प्रमुख शहारांमधले अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई-२३ हजार ३५
ठाणे ३० हजार ९७७
पुणे-१८ हजार ६८०
सातारा- ६११
नाशिक- २६८३
जळगाव-१७८७
औरंगाबाद-३८०६
नागपूर- ५२७

गरज असेल तरच बाहेर पडा. बाहेर पडायचं असेल तर मास्क जरुर लावा. बाहेरुन घरात आल्यानंतर हात आणि पाय स्वच्छ धुवा. जेवणात लसूण, हळद, काळे मिरे, लवंग यांचा वापर वाढवा. स्वतःची काळजी घ्या. वास आणि चव गेल्यास किंवा करोनाची काहीही लक्षणं आढळल्यास तातडीने तपासणी करुन घ्या. घाबरु नका मात्र काळजी घ्या असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. तसंच बाहेर गेल्यावर सोशल डिस्टन्सिंग पाळा असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.