News Flash

7th Pay Commission : प्रमोशननंतर पगारवाढ कधी मिळणार? सरकारनं दूर केला संभ्रम

अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागानं दिलं स्पष्टीकरणं

संग्रहित छायाचित्र

केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रमोशन (बढती) मिळाल्यानंतर देण्यात येणाऱ्या पगारवाढीसंदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. प्रमोशननंतर पगारवाढ मिळण्याच्या तारखेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात होता. कर्मचाऱ्यांच्या मनात पडलेल्या प्रश्नाचं अखेर सरकारनेच उत्तर दिलं आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला २ जानेवारी ते ३० जूनच्या दरम्यान प्रमोशन मिळालं असेल, तर त्या कर्मचाऱ्याला १ जानेवारीपासूनच वाढीव पगार मिळेल, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

एखाद्या बढती मिळाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पगारवाढही दिली जाते. पगारवाढीसंदर्भात कर्मचाऱ्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला. प्रमोशन मिळाल्यानंतर पगारवाढीसाठी कोणती तारीख ग्राह्य धरली जाणार, यावरून गोंधळाचे वातावरण आहे. केंद्र सरकारनं हा गोंधळ दूर केला असून, अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागानं यावर स्पष्टीकरणं दिलं आहे.

खर्च विभागाच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या कर्मचाऱ्याला ठरलेल्या तारखेच्या आधी वा नंतर मिळाले. तर त्या कर्मचाऱ्याला सहा महिन्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतरच पगारवाढ दिली जाणार आहे. मग त्या कर्मचाऱ्याला प्रमोशन १ जानेवारीला मिळो अथवा १ जुलै. कोणती तारीख आधी येते त्यावर हे अवलंबून असणार आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याला प्रमोशन देताना अथवा पगारवाढीसंदर्भातील तारीख निवडण्यासंदर्भात दोन पर्याय दिले जातात. त्याच पर्यायांच्या आधारावर कर्मचाऱ्यांना लाभ दिले जातात.

असा झाला बदल –

पूर्वी कर्मचाऱ्यांना १०, २० आणि ३० वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिलं जात होतं. मात्र, आता त्या नियमात बदल करण्यात आला असून, कामाच मूल्यमापन करून प्रमोशन देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सरकारनं पगारवाढीसंदर्भातील संभ्रम दूर केला असला तरी पन्नास लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. सरकारनं फिटमेंठ फॅक्टर वाढवून मूळ वेतन २६ हजार इतक ठेवावं अशी मागणी केली जात आहे. सरकारनं ही मागणी मान्य केली, तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात आठ हजारांची वाढ होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 3:01 pm

Web Title: 7th pay commission central government cleared confusion promotion related increment bmh 90
Next Stories
1 “…तरीही भारताऐवजी आम्हाला काळ्या यादीत टाकलं”; पाकिस्तानचा थयथयाट
2 अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे सरकारची नवी योजना; पंतप्रधानांनी केली घोषणा
3 आतापर्यंत १ कोटी FASTag वितरीत; टोल वसूली ४६ कोटींवर
Just Now!
X