News Flash

धक्कादायक! विवाहबाह्य संबंधांच्या डेटिंग अ‍ॅपवर आठ लाख भारतीय पुरुष-महिलांच्या उड्या

लग्नापलीकडे जाऊन असे संबंध बनवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर अनेक जण इच्छुक आहेत.

धक्कादायक! विवाहबाह्य संबंधांच्या डेटिंग अ‍ॅपवर आठ लाख भारतीय पुरुष-महिलांच्या उड्या

भारतीयांमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवण्याची मानसिकता मोठया प्रमाणात वाढली आहे. खास विवाहबाह्य संबंधांसाठी असणाऱ्या एका डेटिंग अ‍ॅपवरुन हे सत्य समोर आले आहे. आठ लाख विवाहित भारतीयांनी विवाहाबाह्य संबंधांसच्या डेटिंग अ‍ॅपवर नोंदणी केली आहे. टेक्नोलॉजीसाठी ओळखल्या जणाऱ्या बंगळुरुमधून या अॅपवर नोंदणी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

रिपोर्ट मधून समोर आलेल्या आकडयांवरुन, नव्या वर्षात हजारो भारतीय आपल्या जोडीदारांची फसवणूक करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडयात अनेक जोडपी कामावर रुजू झाली. मुलांच्या हिवाळयातील सुट्टया संपल्या होत्या. त्यानंतर एकाएकी डेटिंग अॅपवरील ट्रॅफिकमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली.

महिलादेखील मागे नाहीत
नोव्हेंबर २०१९ मध्ये या अ‍ॅपवर बंगळुरु, मुंबई, कोलकाता, दिल्ली, पुणे, नवी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, गुरगाव, अहमदाबाद, जयपूर, चंदीगड, लखनऊ, कोची, नोएडा, विशाखापट्टणम, नागपूर, सूरत आणि भुवनेश्वर या शहरातून पुरुषांनी नोंदणी केली होती. महिलादेखील यामध्ये मागे नाहीत. बंगळुरु, मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, हैदराबाद, चेन्नई, गुरगाव, चंदीगड, अहमदाबाद, जयपूर, कोची, नोएडा, लखनऊ, सूरत, गुवहाटी, नागपूर आणि भोपाळ या शहरातील महिलांनी नोंदणी केली.

नोंदणीत ५६७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ
लग्नापलीकडे जाऊन असे संबंध बनवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर अनेक जण इच्छुक आहेत. डेटिंग अ‍ॅपच्या नोंदणीत ५६७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे फ्रेंच ऑनलाइन डेटिंग कम्युनिटी प्लॅटफॉर्मने म्हटले आहे. या वरुन डेटिंग अॅपची लोकप्रियता दिसून येते. नव्या वर्षात लोकांनी मनाशी काही गोष्टी ठरवलेल्या असू शकतात. त्यामुळे जानेवारी महिन्यात अशा प्रकारे ट्रॅफिक वाढलेले असू शकते.

महिन्याभराची नोंदणी एका आठवडयात
मागच्या दोन आठवडयांच्या तुलनेत जानेवारी २०२० मध्ये सबस्क्रिप्शन ३०० टक्क्यांनी वाढले. संपूर्ण महिन्याभरात जितकी नोंदणी होते ती जानेवारीच्या पहिल्या आठवडयात झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 10:25 am

Web Title: 8 lakh married indians want to cheat partners using extramarital dating app dmp 82
Next Stories
1 धक्कादायक! भारतात पाच महिन्यात २५ हजार चाईल्ड पॉर्न अपलोड, महाराष्ट्रही टॉप यादीत
2 #CAA: शाहीन बागमधील बहुतांश आंदोलक पाकिस्तानी आणि बांगलादेशी – भाजपा
3 तुमचा धर्म कोणता? सरकार ‘या’ कारणासाठी मागणार प्रमाणपत्र
Just Now!
X