पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आठ टप्प्यांत मतदान घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

राज्यात आठ टप्प्यात मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे, तो थांबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी एम. एल. शर्मा या वकिलांनी आपल्या याचिकेत केली आहे. या निर्णयामुळे घटनेतील अनुच्छेद १४ आणि २१ चे उल्लंघन होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

या याचिकेवर येत्या काही दिवसात सुनावणी होण्याची शक्यता आहे, पश्चिम बंगालमध्ये धार्मिक घोषणाबाजी करण्यात आली. त्याबाबत एफआयआर नोंदविण्याचे आदेश सीबीआयला द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. जय श्रीराम अथवा अन्य धार्मिक घोषणाबाजीमुळे असंतोष निर्माण होत असून तो भादंवि आणि लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१नुसार गुन्हा आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.