29 September 2020

News Flash

महाराष्ट्रासह ८ राज्यांत दहशतवादी हल्ल्याची शक्यता; कर्नाटक पोलिसांकडून अॅलर्ट

कर्नाटक पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना एका व्यक्तीने फोनवरुन सांगितले की, महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर ६ राज्यांमध्ये हल्ला घडवून आणण्याचा कट रचला जात आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

श्रीलंकेत इस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या किनारी राज्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. समुद्रमार्गे दहशतवादी या राज्यांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेता ही खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रासह ८ राज्यांना पत्र लिहून दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची सूचना देत अॅलर्ट दिला आहे.

कर्नाटक पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना एका व्यक्तीने फोनवरुन सांगितले की, महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर ६ राज्यांमध्ये हल्ला घडवून आणण्याचा कट रचला जात आहे. या माहितीनंतर कर्नाटकच्या पोलिसांनी महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पुदुच्चेरी, गोवा या राज्यांच्या पोलीस प्रमुखांना पत्र लिहून अॅलर्ट राहण्यास सांगितले आहे.

ज्या व्यक्तीने कर्नाटक पोलिसांना फोन केला त्याने स्वतः एक ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगितले आहे. स्वामी सुंदर मुर्ती असे स्वतःचे नाव सांगताना शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता बंगळुरू शहर पोलिसांच्या कन्ट्रोल रुमला त्याने फोन केला होता. यामध्ये त्याने सांगितले होते की, देशातील आठ राज्यांमध्ये दहशतवादी स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत आहेत.

यावेळी दहशतवादी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट घडवून आणू शकतात असेही त्याने म्हटले आहे. तामिळनाडूच्या रानाथपुरम येथे १९ दहशतवादी असल्याचाही त्याने दावा केला आहे. या फोननंतर कर्नाटक पोलिसांनी सर्व संबंधीत राज्यांच्या पोलिसांना पत्र लिहून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान, तामिळनाडूनच्या चेन्नई पोलिसांनाही एक फोन आला होता. यामध्ये रामेश्वरमधील प्रसिद्ध पंबन सी पुल उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या फोन नंतर पोलिसांनी संबंधीत पुलावर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले होते. तसेच इतर महत्वाच्या ठिकाणांनाही त्यांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 8:11 am

Web Title: 8 states will happened terrorist attack alert from karnataka police
Next Stories
1 बालका, एकदा तरी निवडणूक लढवून दाखव!
2 मध्यमवर्गाचे योगदान अमूल्य – मोदी
3 काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे काल्पनिक कथा!
Just Now!
X