News Flash

भयंकर! ८ वर्षाच्या चिमुरड्याने नाल्यात बुडवून दीड वर्षाच्या बाळाची केली हत्या

८ वर्षांच्या मुलाने दिलेल्या या कबुलीनंतर पोलीसही चकीत झाले आहेत

८ वर्षांच्या चिमुरड्याने नाल्यात बुडवून दीड वर्षाच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतल्या फतेहपूर बेरी भागात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ वर्षांच्या चिमुरड्याने दीड वर्षांच्या लहान मुलाला एका नाल्यात बुडवून बुडवून ठार केलं. त्यानंतर त्याच्यावर विटा आणि दगडांचाही मारा केला. दीड वर्षांच्या मुलाच्या बहिणीने माझ्या भावाला मारलं होतं आणि तो खाली पडला होता. या गोष्टीचा राग मनात ठेवून सूड घेण्याच्या मी या मुलाला मारलं असं आठ वर्षांच्या मुलाने सांगितलं आहे.

२७ एप्रिलला दक्षिण दिल्लीच्या फतेहपूर बेरी भागात दीड वर्षांचा हा मुलगा त्याच्या आई आणि बहिणीसोबत घराच्या छतावर झोपला होता. घराच्या छतावरूनच आठ वर्षांच्या मुलाने या मुलाला झोपेतच उचलले आणि घराशेजारी असलेल्या नाल्यात बुडवले. त्यानंतर त्याला पुन्हा बाहेर काढले आणि पुन्हा बुडवले त्यानंतर त्याच्यावर दगड आणि विटांच्या तुकड्याचा मारा केला. त्यानंतर त्याला नाल्यात फेकून दिले. हा मुलगा हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. शोध घेतल्यावर दीड वर्षांच्या मुलाचा मृतदेह पोलिसांना नाल्यात आढळला.

ही घटना कशी काय घडली याचा शोध घेताना पोलिसांच्या लक्षात आले की त्याच भागात रहाणारा एक आठ वर्षांचा मुलगाही गायब आहे. पोलिसांनी त्याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. शोध घ्यायला सुरूवात केल्यापासून तीन तासात पोलिसांनी त्याला शोधलं. या मुलाची चौकशी केली असता या मुलाने आपणच सूड घेण्याच्या भावनेतून दीड वर्षाच्या मुलाला संपवलं अशी कबुली दिली आहे. आठ वर्षांच्या मुलाने हत्येची कबुली दिल्याचं ऐकून पोलीसही चाट पडले. दरम्यान या मुलाला आता ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर उभे केले जाणार आहे. त्यानंतर त्याला शिक्षा सुनावली जाईल. एका आठ वर्षांच्या मुलाने बदल्याच्या भावनेतून दीड वर्षांच्या मुलाला संपवले ही घटना निश्चितच धक्कादायक मानली जाते आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 12:45 pm

Web Title: 8 year old boy in delhi drowns 18 month old boy for revenge
Next Stories
1 पुजाऱ्याने १०० वर्षांपूर्वी चोरलेली मुर्ती नातवाने शाप लागेल या भीतीने केली परत
2 …म्हणून रशियापेक्षा संरक्षणावर जास्त खर्च करुनही भारताकडे शस्त्रास्त्रांची कमतरता
3 ‘तू माझ्या हिटलिस्टमध्ये, उद्या बघतो तुला’, मतदानादिवशी भाजपा नेत्याची पोलीस अधिकाऱ्याला धमकी
Just Now!
X