News Flash

“पूरग्रस्तांसाठी हे ही घ्या”, आठ वर्षांच्या चिमुरडीने मुख्यमंत्र्यांना काढून दिले कानातील सोन्याचे डूल

मुख्यमंत्र्यांनीच याबद्दल फेसबुकवर पोस्ट केली आहे

मुख्यमंत्र्यांनी पोस्ट केलेला फोटो

मागील काही आठवड्यांपासून देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पुराने थैमान घातले आहे. केरळमध्येही पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमधील लोक पूरग्रस्त भागांना आपल्या परीने मदत करत आहेत. अशीच मदत केरळमधील कोच्ची येथील एका चौथीच्या विद्यर्थीनीने केली आहे. या मुलीने साठवलेले सर्व पैसे पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले आहेत. इतकचं नाही तर या मुलीने मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना आपल्या कानातील सोन्याचे डूलही पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले आहेत.

मुख्यमंत्री विजयन हे सीपीआयचे (एम) नेते एम. एम. लॉरेन्स यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी ८ वर्षांची लियाना थेऊस ही सभागृहाच्या दरवाजाजवळ विजयन बाहेर येण्याची वाट पाहत उभी होती. विजयन कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर आले आणि गाडीत बसले. याच वेळी लियाना धावत त्यांच्याकडे आली आणि तिने आपल्या गल्ल्यातील सर्व पैसे पूरग्रस्तांना मदत म्हणून देत असल्याचे सांगित त्यांच्याकडे काही रक्कम दिली. ही रक्कम मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये वापरावी असं तिने मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

लियाना इतक्यावरच न थांबता तिने कानातील सोन्याचे डूल काढले आणि ते मुख्यमंत्र्यांच्या हातात दिले. ‘हे सुद्धा पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वापरा’ असं तिने मुख्यमंत्र्यांना सांगितलं. हा सर्व घटनाक्रम स्वत: मुख्यमंत्र्यांनी आपल्या पेजवरुन लियानाच्या फोटोसहीत पोस्ट केला आहे. ‘तिने जमवलेले सर्व पैसे मला दिले. जेव्हा मी तेथून निघत होतो तेव्हा तिने ‘हे ही घ्या’ असं म्हणत आपल्या कानातील डूल माझ्या हातात टेकवले,’ अशा शब्दांमध्ये या प्रसंगाचे वर्णन विजयन यांनी आपल्या पोस्टमध्ये केले आहे.

लियानाचे वडील चित्रपट क्षेत्रामध्ये निर्मिती विभागात काम करतात तर तिची आई नर्स आहे. लियाना सध्या अॅलव्हा येथील सेंट फ्रान्सीस हायस्कूलमध्ये चौथ्या इयत्तेमध्ये शिकत आहे.

महाराष्ट्राबरोबरच केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये हजारो लोकांचे पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळला पूराचा सर्वाधिक फटका बसला असून १२० जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून ३६ जण बेपत्ता झाले आहेत. राज्य सरकारने १३ जिल्ह्यांमधील एक हजार ३८ गावांना पूरग्रस्त घोषित केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:11 pm

Web Title: 8 yr old girl donates her gold earrings and piggy bank savings towards flood relief funds scsg 91
Next Stories
1 अरुण जेटलींच्या अंत्यसंस्कारावेळी चोरांचा सुळसुळाट, बाबूल सुप्रियोंसहित ११ जणांचे मोबाइल चोरीला
2 ३० वर्षांपासून ‘तो’ एकाचवेळी करत होता तीन सरकारी नोकऱ्या, असा झाला भांडाफोड
3 आर्थिक मंदीच्या झळा; मारुती सुझुकीने केली ३००० कंत्राटी कामगारांची कपात
Just Now!
X