07 June 2020

News Flash

वेग वाढवला, मागच्या २४ तासात करोना व्हायरसच्या ८ हजार चाचण्या

भारतात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या जशी वाढत आहे तसाच चाचण्यांचा वेग देखील वाढवण्यात आला आहे.

भारतात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या जशी वाढत आहे तसाच चाचण्यांचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. मागच्या २४ तासात देशभरात करोना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता असलेल्यांच्या एकूण आठ हजार चाचण्या करण्यात आल्या. एकादिवसात केलेल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत शुक्रवारी ही माहिती दिली.

भारतात आतापर्यंत २३०१ जणांचा करोना व्हायरसची लागण झाली आहेत. त्यात ५६ जणांचा मृत्यू झाला तर १५६ जण पूर्णपणे बरे झाले. महाराष्ट्रात आणि तामिळनाडू या दोन राज्यात करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ४२३ तर तामिळनाडूत ३०९ रुग्ण आहेत.

आज लॉकडाउनचा १० वा दिवस असून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. मागच्या दोन दिवसात तबलिगी जमातशी संबंधित ६४७ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. १४ राज्यांमध्ये तबलिगी जमातशी संबंधित करोनाग्रस्त आढळले आहेत. आतापर्यंत ६६ हजार नागरिकांच्या करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशातील १८२ लॅबमध्ये करोनाच्या चाचण्यास सुरु आहेत. त्यात १३० सरकारी प्रयोगशाळा आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 6:14 pm

Web Title: 8000 covid 19 samples tested in last 24 hours dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 लॉकडाउनच्या आदल्या दिवशीच ‘तो’ ठेऊन गेला साडेसात लाखांची टीप
2 नरेंद्र मोदींनी मान्य केला उद्धव ठाकरेंचा ‘हा’ सल्ला, म्हणाले….
3 धक्कादायक, पाच दिवसात भारतात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०२ टक्क्याने वाढली
Just Now!
X