03 June 2020

News Flash

पाणीपुरवठा, सांडपाणी निचऱ्यासाठी ८१ शहरांची ५७०० कोटींची गुंतवणूक

राज्यांमधील ८१ शहरे ५७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहेत.

पाणीपुरवठा आणि सांडपाण्याचा निचरा यासह मूलभूत सुविधांसाठी तामिळनाडू, मध्य प्रदेश, झारखंड, ओदिशा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील ८१ शहरे ५७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहेत.
चालू वर्षांसाठी ‘अमृत’ कृती योजनेअंतर्गत ही गुंतवणूक केली जाणार आहे. शहरविकास सचिव मधुसूदन प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च मंत्रीसमितीने वार्षिक योजनेला मंजुरी दिली आहे.
यासाठी केंद्र सरकारकडून २४४० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य मिळणार असून उर्वरित रक्कम राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलब्ध करावयाची आहे. यापैकी ४१ शहरातील सांडपाणी निचऱ्यासाठी ११३३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, असे शहरविकास विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2015 1:53 am

Web Title: 81 cities to invest over rs 5700 crore in water sewerage system
Next Stories
1 मंगळुरूमधील प्रतिबंधात्मक आदेश मागे
2 अभिनेता सईद जाफरी यांचे निधन
3 ‘मॅगी’ला टक्कर देण्यासाठी रामदेव बाबांचे ‘पतंजली आटा नूडल्स’
Just Now!
X