शिक्षणासाठी वयाची अट नसते असं एक मुर्तीमंत उदाहरण ओडिशामध्ये घडले आहे. ८१ वर्षीय माजी आमदार आणि खासदार राहिलेल्या नारायण साहू यांनी आपली पीएचडीचा अभ्यास सोडलेला नाही.


पीएचडी पूर्ण करण्यासाठी साहू हे सध्या येथील उत्कल विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत. साहू सध्या सर्वसाधारण रुममध्ये राहतात. यासाठी त्यांना एक छोटीशी खोली आहे. त्यामध्ये त्यांच्या बेडवर मच्छरदानी, पुस्तकांनी भरलेले, अभ्यासाच्या साहित्यांनी भरलेले टेबल आणि त्यांच्या कुटुंबियांची काही छायाचित्रेही तिथे होती.

पालहारा येथून दोन वेळेस आमदार झालेले साहू हे देवगढ येथील खासदार आहेत. साहू यांना सुरुवातीला रााजकारणाची चांगलीच आवड होती. मात्र, नंतरच्या काळता राजकारणातील अनेक चुकीच्या गोष्टी आपण पाहिल्याने आता हे बस्स झालं असं मनाशी ठरवत त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी स्वत:हून एक विद्यार्थी म्हणून ओळख निर्माण केली, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, १९६३मध्ये सोहू यांनी इकॉनॉमिक्स या विषयामध्ये एमए केले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणही त्यांनी उत्कल विद्यापीठातून केले. दरम्यान, २०१२ पासून ते पीएचडीसाठी प्रयत्न करीत आहेत.