पाकिस्तानला जेरीस आणणाऱ्या भारताच्या जेम्स बॉण्ड अर्थात अजित डोवाल यांना भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कायम ठेवण्यात आले आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही देण्यात आला आहे. डोवाल यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये डोवाल यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

जाणून घेऊयात कोण आहेत डोवाल…

– उत्‍तराखंडमधील पौडी गढवालमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण अजमेर सैनिक स्‍कूलमध्ये झालं आहे. आग्रामध्ये त्यांनी अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलं.

– ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या माध्यमांतून पाकिस्तानमध्ये सात वर्ष मुस्लीम होऊन राहत भारतासाठी हेरगिरी करत माहिती पुरवली.

– अजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. सैन्याकडून देण्यात येणार्‍या किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलिस अधिकारी आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते.

– २०१४ साली नरेंद्र मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले. तेव्हापासून अजित डोवाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. पंतप्रधान मोदींचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे.

– १९९९ साली कंधारमध्ये इंडियन एअरलाइनचे आयसी ८१४ विमान अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

– १९८४ मध्ये खलिस्तानी आतंकवादीविरोधात चालवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका निभावली, यात ते सीक्रेट एजेंट बनून रिक्षावाल्याच्या पेहराव करून सुवर्ण मंदिरात गेले होते.

– उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

– भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक २’मध्ये महत्वाचा वाटा

– इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तब्बल ३३ वर्ष अधिकारी पदावर जम्मू कश्मीर, पंजाब येथे काम केले आहे.