09 August 2020

News Flash

मध्य प्रदेशात बस अपघातात ९ जण ठार, १० जखमी

काही जखमी व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, बसचालक अतिशय वेगाने बस हाकत होता.

| December 6, 2019 12:06 am

भरधाव वेगाने जाणाऱ्या एका बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली,

रेवा : मध्य प्रदेशच्या रेवा जिल्ह्य़ात गुरुवारी सकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या एका बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात नऊ जण ठार, तर १० जण जखमी झाले.

बस सिधी जिल्ह्य़ाकडे जात असताना सकाळी साडेसहाच्या सुमारास रेवापासून २५ किलोमीटर अंतरावरील गूढ मार्गावर हा अपघात झाला. सकाळी ५ वाजताच्या सुमारास ट्रक रस्त्यावर उभा करून ठेवल्यानंतर ट्रकचालक प्रात:विधी आटपत होता. याच वेळी भरधाव बसने त्याला धडक दिली, असे रेवाचे पोलीस अधीक्षक आबीद खान यांनी सांगितले.

या भागात धुक्यामुळे दृश्यमानता कमी झालेली असल्याने हा अपघात झाला असावा, असे रेवा परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चंचल शेखर म्हणाले. अपघातानंतर बसचालक पळून गेला.

काही जखमी व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, बसचालक अतिशय वेगाने बस हाकत होता. बसने ट्रकला मागून धडक दिल्यामुळे नऊ जण ठार, तर १० जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिला आणि सहा महिन्यांच्या एका मुलाचा समावेश आहे.

जखमींना संजय गांधी स्मृती रुग्णालय या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे खान यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 12:06 am

Web Title: 9 killed in bus accident in madhya pradesh zws 70
Next Stories
1 गुन्हे रोखण्याची गॅरंटी प्रभू रामानेही दिली नसेल; बलात्काराच्या घटनांवर भाजपा मंत्र्याचे अजब विधान
2 ‘एटीएम’चे नियम बदलणार, RBI कडून घोषणा
3 एक म्हणाला कांदे खाणं बंद करा, दुसरा म्हणतो मी कांदा खाल्ला नाही
Just Now!
X