23 January 2020

News Flash

धक्कादायक! उत्तर प्रदेशात जमिनीच्या वादातून ९ जणांची हत्या, १९ जखमी

या हिंसाचारात १९ जण जखमीही झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे.

सोनभद्र : जमिनीच्या वादातून ९ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

जमिनीच्या वादातून विरोधी गटाकडून गोळ्या घालून ९ जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील घोरवाल भागात घडली आहे. या हिंसाचारात १९ जण जखमीही झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. बुधवारी ही घटना घडली.

स्थानिकांच्या माहितीनुसार, घोरवाल येथील सापही गावात ही घटना घडली असून जमिनीच्या वादातून दोन गटातमध्ये हाणामारी सुरु झाली यावेळी काही जणांनी गोळीबारही केला. त्यानंतर पळापळ सुरु झाली यामध्ये ९ लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये ३ महिला आणि ६ परुषांचा समावेश आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच डीजीपींना व्यक्तिगतरित्या या प्रकरणात लक्ष घालून चौकशीचे तसेच दोषींना पकडण्यासाठी प्रभावीपणे कारवाईचे निर्देश दिले आहेत.

पोलीस महानिरिक्षक प्रवीण कुमार यांनी सांगितले की, या गावातील सरपंचाने २ वर्षांपूर्वी ९० एकर जमीन खरेदी केली होती. त्यानंतर तो आपल्या काही सहकाऱ्यांसोबत ही जमीन ताब्यात घेण्यासाठी गेला. त्याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला त्यानंतर मोठा वाद झाला. त्यानंतर त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला.

First Published on July 17, 2019 6:07 pm

Web Title: 9 people killed 19 injured in land dispute in uttar pradesh aau 85
Next Stories
1 मॉब लिंचिंगच्या घटना ही राज्यांच्या पोलीस प्रशासनाची जबाबदारी : केंद्रीय गृह राज्यमंत्री
2 जमिनीच्या वादातून गोळीबार, नऊ जणांचा मृत्यू, २५ जखमी
3 बापरे… एवढा वेळा वाहतुकीचे नियम मोडले की एक फुटाची पावतीही अपुरी पडली
Just Now!
X