03 March 2021

News Flash

साखळी बॉम्बस्फोटाने काबूल हादरले; ९ जण ठार

पाच ठिकाणी झाले बॉम्बस्फोट

प्रातिनिधिक छायाचित्र

अफगाणिस्तानची राजधानी काबूल साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. रविवारी शहरातील विविध भागात पाच बॉम्बस्फोट झाले. यात जवळपास ९ नागरिक ठार झाले आहेत. २० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानचे गृहमंत्री मसूद अंदाराबी यांनी या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

अफगाणिस्तानात सातत्यानं बॉम्बस्फोट घडवून आणले जात आहेत. गेल्या काही आठवड्यात अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत. शनिवारी अफगानिस्तानच्या परवान प्रांतात अमेरिकेचा एयरबेस असलेल्या बगराम एयरफील्डवर दहशतवाद्यांनी निशाणा साधला होता. दहशतवाद्यांकडून रॉकेटचा मारा करण्यात आला होता. मात्र, यामध्ये कोणतंही नुकसान झालं नसल्याचं सांगण्यात आलं होतं. कलंदर खिलच्या भागात एका ट्रकमधून सकाळी सहा वाजताच्या सुमारास अमेरिकेच्या बगराम एयरफिल्डवर पाच राउंड रॉकेट डागण्यात आले होते. या रॉकेट्सला अफगानी सुरक्षा रक्षकांनी निकामी केलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काबुलपासून उत्तरेकडे जवळपास ५०० किमी अंतरावर असलेल्या बगराम एयरफिल्ड हे तळ अमेरिकेच्या महत्त्वाच्या एयरबेसपैकी एक आहे. १९ वर्षे अमेरिकन आणि नाटोच्या सैनिकांकडून याचा वापर केला जात आहे. या ठिकाणी झालेल्या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारली नाही.

यापूर्वी १२ डिसेंबर रोजी काबुल शहराच्या विविध भागात १० रॉकेट्स डागण्यात आले होते. त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर इतर दोन व्यक्ती जखमी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे २१ नोव्हेंबर रोजी शहराच्या विविध भागात किमान २३ रॉकेट्स डागण्यात आली होती. त्यामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 4:32 pm

Web Title: 9 people killed and 20 more wounded in an explosion in kabul in afghanistan bmh 90
Next Stories
1 पश्चिम बंगाल : “असा रोड शो आयुष्यात पाहिला नाही”; गर्दी बघून अमित शाह भारावले
2 विस्ट्रॉनकडून कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची चूक मान्य; Apple चाही कंपनीला झटका
3 नेपाळमधील ओली सरकार बरखास्त; नव्या वर्षात होणार निवडणुका
Just Now!
X