News Flash

जम्मू-काश्मीर: लष्कराची मोठी कारवाई; ९ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

काश्मीर खोऱ्यात गेल्या २४ तासात लष्कराने विविध ठिकाणी कारवाई करुन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

संग्रहीत

भारतीय लष्कराने काश्मीरमधील विविध भागांमध्ये केलेल्या कारवाईत ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दरम्यान, या कारवाईत एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.एएनआयनं लष्कराच्या सुत्रांच्या हवाल्यानं याबाबत ट्विट केलं आहे.

लष्करी सुत्रांच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत भारतीय लष्करानं काश्मीर खोऱ्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये दक्षिण काश्मिरमधील बाटपुरा येथे काल ४ दहशवादी मारले गेले. तर इतर ५ दहशतवादी नियंत्रण रेषेवरील केरन सेक्टरमध्ये ठार झाले आहेत. केरन सेक्टरमध्ये ठार झालेले दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात होते.

दरम्यान, या कारवाईत भारताचा १ जवान शहीद झाला आहे. तर इतर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असल्याने आणि डोंगराळ भाग असल्याने जखमी जवानांना बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. अद्यापही हे ऑपरेशन सुरुच आहे, अशी माहिती देखील लष्करी सुत्रांनी दिली असल्याचे ट्विट एएनआयनं केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 10:51 am

Web Title: 9 terrorists killed by indian army in last 24 hrs in kashmir valley 1 indian army soldier has been lost his life aau 85
Next Stories
1 दिवे लावण्याआधी सॅनेटायझर वापराल तर महागात पडेल
2 लॉकडाउनमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या; क्रमवारीत महाराष्ट्र-बिहार एकाच स्थानी
3 Coronavirus: भारतात करोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला ३,३७४वर, ७७ जणांचा मृत्यू
Just Now!
X