शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी चेन्नईतील एका नऊ वर्षांच्या मुलीने तिने बचत केलेली दीड लाख रुपयांची रक्कम पोलिसांना दिली आहे.

श्रीहिता नावाच्या या मुलीच्या वडिलांच्या कार्यालयात पोलिसांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात टेहळणी कॅमेरे बसवण्याचे फायदे समजावून सांगण्यात आले होते. त्यामुळे प्रेरित होऊन तिने बचतीची दीड लाखांची रक्कम शहर पोलिसांना दान केली. तिच्या या कृतीसाठी पोलीस आयुक्त ए.के. विश्वनाथ यांनी तिला त्यांच्या कार्यालयात बोलावून तिचे कौतुक केले, असे पोलिसांनी एका निवेदनात सांगितले.