News Flash

…अन् कर्करोग पीडितेला झाली एचआयव्हीची लागण

केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी तातडीने मागवला अहवाल

संग्रहित छायाचित्र

कर्करोगाने पीडित असलेल्या एका ९ वर्षाच्या मुलीवर डॉक्टरांच्या चुकीमुळे मोठे संकट ओढवले असून तिच्या शरीरात रक्त चढवताना ती एचआयव्ही बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. केरळमध्ये हा प्रकार घडला असून राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, तिरुअनंतपूरम येथील अलपुझा वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार घडला असून या मुलीच्या एका डोळ्यावर सूज आल्याने ती येथील विभागीय कर्करोग विभागात उपचारांसाठी दाखल झाली होती. त्यासाठी डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्या. यामध्ये रक्ताच्या चाचण्याही करण्यात आल्या. यात ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

ही बाब उघड झाल्यानंतर या मुलीच्या वडिलांनी संबंधीतांवर स्थानिक पोलिस स्थानकांत तक्रार दाखल केली असून यात त्यांनी आरोप केला आहे की, मुलीच्या शरीरात रक्च चढवण्यात आल्यानंतरच तीला एचआयव्हीची लागण झाली आहे. मात्र, ही लागण कशी झाली याचा अजून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, केरळचे आरोग्यमंत्री के. के. श्यालजा यांनी या प्रकरणाचा विभागीय कर्करोग केंद्राच्या प्रमुखांकडून तातडीने अहवाल मागवला आहे.

या मुलीच्या शरीरात चढवण्यात आलेले रक्त हे तपासणी झालेले होते किंवा नाही याचाही तपास करण्यात येत आहे. एकूणच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा अक्षम्य आणि संतापजनक प्रकार घडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 5:31 pm

Web Title: 9 yrs old cancer patient diagnosed with hiv after blood transfusion
Next Stories
1 जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला, २ दहशतवाद्यांचा खात्मा
2 लंडन मेट्रो बॉम्बस्फोटाप्रकरणी १८ वर्षाच्या तरुणाला अटक
3 पेट्रोल दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री म्हणाले, कार-बाईक असणाऱ्यांकडे पैशांची कमी आहे का?
Just Now!
X