21 April 2019

News Flash

9/11 Attack : आजच्या दिवशी दहशतवादी हल्ल्यानी हादरली होती अमेरिका, २,९७७ लोकांचा गेला होता बळी

9/11 Attack : अमेरिकेवरील या हल्ल्याने  संपूर्ण जग हादरले होते. आजही हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. 

9/11 Attack : अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज १७ वर्ष पूर्ण झाली. अल कायदाच्या १९ दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर, पँटॉगॉन आणि पेनिसिल्व्हेनियामध्ये एकाच वेळी मोठे दहशतवादी हल्ले घडवले होते. दहशतवाद्यांनी चार पॅसेंजर एअरक्राफ्टचे अपहरण केले होते. त्यापैकी दोन प्रवासी विमाने दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवरमध्ये घुसवली. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या विमान हल्ल्यात तब्बल २,९७७ लोकांचा बळी गेला. हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये ५७ देशांच्या नागरिकांचा समावेश होता. अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा यामागे हात होता. हल्ल्याचा बदला घेत अमेरिकेने 2 मे 2011 रोजी पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये ओसामाचा खात्मा केला होता.

११ सप्टेंबर २००१ रोजी सकाळी न्यूयॉर्कच्या आकाशातून उडणारे फ्लाइट-11 मध्‍ये अजब हालचाल झाली. या विमानात प्रवास करणाऱ्या ९२ जण अनभिज्ञ होते. अल कायदाच्या कटाचे आपण शिकार झालो आहोत याबाबच त्यांना कल्पना नव्हती. हल्ल्याच्या वेळी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्‍ये जवळपास १८ हजार कर्मचारी काम करत होते. सकाळी ८ वाजून १९ मिनिटांनी ५ दहशतवाद्यांसह ५६ पॅसेंजर्स आणि ९ क्रू मेंबर्स असलेले युनायटेड एअरलाइनसच्या १७५ या विमानाला दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या साऊथ टॉवरमध्ये घुसवले होते.  ट्विन टॉवरमध्ये विमान घुसल्यानंतर इमारतीत आग लागली आणि धुराचे लोट बाहेर येऊ लागले. या दहशतदवादी हल्ल्यांमध्ये २९७७ जणांचा बळी गेला. अमेरिकेवरील या हल्ल्याने  संपूर्ण जग हादरले होते. आजही हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत.

First Published on September 11, 2018 11:52 am

Web Title: 911 attack the 911 world trade center attack 17 years