31 May 2020

News Flash

इंटरनेट अजूनही ९५ कोटी भारतीयांच्या आवाक्याबाहेर!

अ‍ॅसोचेम आणि डेलॉइट यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत हे वास्तव समोर आले आहे.

| December 27, 2016 02:38 am

नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारकडून रोकडरहित अर्थव्यवस्थेवर भर दिला जात आहे. लोकांनी अधिकाधिक व्यवहार रोकडरहित करावे, त्यासाठी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्यावे असे सल्लेही केंद्राकडून दिले जात आहेत. मोबाइल बँकिंग, ई-व्यवहारांनाही महत्त्व दिले जात आहे. एकीकडे हा असा ई-प्रचाराचा धडाका सुरू असतानाच तब्बल ९५ कोटी भारतीय इंटरनेट सुविधांपासून वंचित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रोकडरहित व्यवहार करायचे तर त्यासाठी इंटरनेट महत्त्वाचेच. परंतु १२५ कोटी भारतीयांपैकी फक्त ३० ते ३५ कोटी भारतीयच इंटरनेटचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे.

अ‍ॅसोचेम आणि डेलॉइट यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत हे वास्तव समोर आले आहे. भारतात इंटरनेटचे जाळे वाढत असून; परवडणाऱ्या दरात ब्रॉडबँड, स्मार्ट उपकरणे आणि मासिक डेटा पॅकेज यांची उपलब्धता वाढविण्यासाठी डिजिटल साक्षरतेचा प्रसार आवश्यक आहेत, असे ‘सायबर गुन्ह्य़ांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचे राष्ट्रीय उपाय’ अशा शीर्षकाच्या या अहवालात म्हटले आहे.  देशात डिजिटल व्यवहारांवर भर दिला जात असला तरी सायबरगुन्ह्य़ांचा धोका वाढता आहे.

या धोक्यांचा विचार करता ते रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केले जाणे महत्त्वाचे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवाल म्हणतो..

  •  दुर्गम भागांपर्यंत डिजिटल सेवा पोहचवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारी  पायाभूत सोयींचा विस्तार करणे गरजेचे
  • शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये संस्थात्मक प्रशिक्षण देऊन डिजिटल साक्षरतेचा प्रसार होणे आवश्यक
  • ‘डिजिटल भारत’ आणि ‘कुशल भारत’ यांचा एकात्मिक उपक्रम आखून त्याअंतर्गत गरजूंना प्रशिक्षण दिले जावे
  • त्यात खासगी क्षेत्रातील संस्थांचा समावेश असावा.  डिजिटल साक्षरता वाढविण्यासाठी स्थानिक भाषा आणि तंत्रज्ञान यांची सांगड घातली जावी.

स्वस्त इंटरनेट , डेटा योजना, स्मार्टफोनच्या घटत्या किमती, अशी अनुकूल परिस्थिती असूनही ९५ कोटी भारतीय इंटरनेट सुविधांपासून वंचित आहेत.

– अ‍ॅसोचेम-डेलॉइटचा संयुक्त अहवाल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2016 2:34 am

Web Title: 95 million indians still unreachable the internet
Next Stories
1 विरोधकांमध्ये एकीचा अभाव
2 रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना केंद्राची रसद
3 दंड भरा, जुन्या नोटा बाळगा!
Just Now!
X