27 February 2021

News Flash

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी ९९.९ टक्के नेत्यांची ‘या’ नावाला पसंती

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुरजेवाला यांनी दिली माहिती

संग्रहीत

बिहार निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल व्हावे यासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहली होती. तर सध्या काँग्रेसच्या भावी अध्यक्षाच्या मुद्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अगोदर राहुल गांधी यांचे नाव समोर येत होते, मात्र आता प्रियंका गांधी यांचे नाव देखील पुढे येत आहे. या दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचं एक महत्वपूर्ण विधान समोर आलं, राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनावेत असं माझ्यासह ९९.९ टक्के काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांना वाटत असल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षातील त्या आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज(शनिवार) १० जनपथ येथील निवासस्थानी बैठक बोलावली आहे.

काँग्रसच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी लवकरच निवड प्रक्रिया सुरू होईल. काँग्रेसचे इलेक्ट्रोल कॉलेज, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते आणि सदस्य हे या पदासाठी जो योग्य आहे त्याची निवड करतील. माझ्यासह काँग्रेसच्या ९९.९ टक्के लोकांना वाटतं की राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनावेत. असं सुरजेवाला यांनी म्हटलं असल्याचं एएनआयाने वृत्त दिलं आहे.

‘त्या’ २३ नेत्यांची सोनिया गांधींनी बोलावली बैठक

भारतीय अर्थव्यवस्थेवर जगालाही विश्वास आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ‘एएसएसओसीएचएएम’ (ASSOCHAM) संमेलनात ते बोलत होते. तसेच, करोना काळातही भारतात विक्रमी परदेशी थेट गुंतवणूक झाली असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. तसेच, आपल्या सामर्थ्याच्या बळावर व संसधानांवर विश्वास करत आत्मनिर्भर भारत पुढे वाटचाल करत आहे. या उद्दिष्टपुर्तीसाठी आमचे मॅन्युफॅक्चरिंगवर विशेष लक्ष आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने सुधारणा करत असल्याचंही मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 1:29 pm

Web Title: 99 9 percent of people including me want rahul gandhi to be elected as party president randeep surjewala msr 87
Next Stories
1 ASSOCHAM FW2020: भारतीय अर्थव्यवस्थेवर जगाचाही विश्वास -पंतप्रधान मोदी
2 धक्कादायक, मुलीनेच प्रियकराच्या मदतीने केली आई-वडिलांची हत्या
3 …पण कोट्यवधी देशवासीयांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं; राहुल गांधींचा मोदींवर ट्विट हल्ला
Just Now!
X